Corona virus : पाच दिवसात 'ही' लक्षणं दिसली, तर कोरोनाची तपासणी लगेच करा नाहीतर....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 01:25 PM2020-03-19T13:25:25+5:302020-03-19T13:27:53+5:30
सर्दी, खोकला या व्यतिरिक्त अन्य काही लक्षणं अशी आहेत जी इन्फेक्टेड व्यक्तीमध्ये दिसून येतात.
कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस जगभरासह भारतात सुद्धा वाढत जात आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयातर्फे या आजाराची तपासणी करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेक कोरोनाचे रुग्ण पळून जाण्याच्या धक्कादायक घटना सु्दधा घडल्या आहेत. या आजारापासून स्वतःला लांब ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला या आजाराच्या लक्षणांबद्दल माहिती असायला हवी. अलिकडे याविषयी एक रिसर्च करण्यात आला होता. त्यानुसार सर्दी, खोकला या व्यतिरिक्त अन्य काही लक्षणं अशी आहेत जी इन्फेक्टेड व्यक्तीमध्ये दिसून येतात.
अमेरिकेतील रिसर्चकर्त्यांद्वारे चीनमधील वुहान शहरातील जवळपास ५० ठिकाणी सॅपंलिंच्या आधारावर रिसर्च करण्यात आला होता. विशेषज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना पिडीत व्यक्तीला १४ दिवस निरिक्षणाखाली ठेवण्यात यावं. या रिसर्चकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या आजाराच्या जाळ्यात अडकत असलेल्या व्यक्तीला पाच दिवसआधी सुका खोकला येत असतो. त्यानंतर ताप यायला सुरूवात होते.
श्वास घ्यायला त्रास होतो. सर्वसामान्यपणे तापाची लक्षणं आणि थकवा जाणवतो. तुम्हाला सुद्धा ही लक्षणं दिसत असतील तर वेळ न घालवता तपासणी करणं गरजेचं आहे. कारण तपासणी करायला उशीर केल्यास कोरोना डिटेक्ट व्हायला वेळ लागू शकतो. त्यामुळे तुमच्या नातेवाईकांना सुद्धा या आजाराची लागणं होऊ शकते. ( हे पण वाचा- Corona virus : घशात सूज आणि खवखव असू शकतं कोरोनाचं इन्फेक्शन, 'असा' करा बचाव)
कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी हेल्पलाईन नंबर
हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही कॉल केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यावेळी तुम्ही परदेशात प्रवास आलात का किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात होतात का असे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर तुम्हाला सेवा पुरवली जाईल हा नंबर प्रत्येक राज्याप्रमाणे वेगळा असेल. तसंच कोरोना व्हायरसची टेस्ट तुम्हाला मोफत करून देण्यात येईल.020-26127394 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही कोरोनाची तपासणी करून घेऊ शकता. ( हे पण वाचा- Coronavirus and Diabetes : डायबिटीसच्या रूग्णांनी रहा सतर्क, 'या' तीन गोष्टींची घ्या विशेष काळजी!)