Corona virus : ऑनलाईन शॉपिंग, नको रे बाबा! त्यामुळे होऊ शकतो कोरोना...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 11:02 AM2020-03-14T11:02:56+5:302020-03-14T11:27:34+5:30

तुम्हालाही ऑनलाईन शॉपिंगमुळे होऊ शकते कोरोनाची बाधा

Corona virus : Threat in india virus can come through plastic packaging beware while you shop | Corona virus : ऑनलाईन शॉपिंग, नको रे बाबा! त्यामुळे होऊ शकतो कोरोना...

Corona virus : ऑनलाईन शॉपिंग, नको रे बाबा! त्यामुळे होऊ शकतो कोरोना...

Next

कोरोना व्हायरस जगभरासह आता भारतात सुद्धा झपाट्याने पसरताना दिसून येत आहे.  कोरोनाचं इन्फेक्शन झालेल्यांची संख्या देशात वाढत आहे. हा व्हायरस चीनमधून साऱ्या जगात पसरला आहे. पण  तुमचा विश्वासही बसणार नाही एक मोठी बातमी संशोधनातून समोर आली आहे. कोरोना व्हायरस प्लास्टिक रॅप किंवा स्टेनलेस स्टीलवर बराच काळ जिवंत राहू शकतो आणि अशा प्लास्टिकला हात लावला तर व्यक्ती इन्फेक्डेड होऊ शकते. विविध वस्तू आणि पृष्ठभागावर  कोरोना व्हायरस किती काळ टिकू शकतो याविषयी शास्त्रज्ञांमध्ये अजूनही अनेक मतभेद  होते. पण ताज्या संशोधनातून यातल्या अनेक शंकां दूर झाल्या आहेत. 

अमेरिकेतल्या हॅमिल्टन इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ व्हायरॉलॉजी लॅबोरेटरीतल्या संशोधकांनी कोरोना व्हायरस कुठल्या भागावर अधिक काळ कार्यरत राहू शकतो याचा रिसर्च  केला आहे. या रिसर्चनुसार  कोरोना व्हायरसला प्लॅस्टिकचं आवरण अनुकूल असतं. प्लास्टिक आणि स्टीलच्या पृष्ठभागावर तो तीन दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो. म्हणजे तुम्ही ऑर्डर केलेली वस्तू पॅकेजिंग करून येताना एखाद्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आली तर त्यावरून तो व्हायरस थेट तुमच्या घरी अथवा तुम्ही जात असलेल्या ठिकाणी येऊ शकतो. ( हे पण वाचा-Corona Virus: समजून घ्या ‘कोरोना’; कोरोनाचे ‘पॅण्डेमिक’ म्हणजे नेमके काय?)

तुम्ही ऑर्डर केलेली वस्तू हातळणाऱ्या व्यक्तीला कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल तर धोका वाढू शकतो. म्हणून ऑनलाइन शॉपिंग करताना सावधानता बाळगायला हवी. काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार, नोटांच्या कागदावरही काही तास कोरोना व्हायरस जिवंत राहू शकतो. त्यामुळे कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेली नोट हाताळली तर त्याचं  इन्फेक्शन होऊ शकतं. यावर उपाय म्हणून सतत हात धुणं, सॅनिटायजरचा वापर करणं हा उत्तम पर्याय आहे. जेणेकरून व्हायरसचं इन्फेक्शन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ( हे पण वाचा- Corona virus : कोरोना व्हायरसच्या इंफेक्शनमुळे असासुद्धा होतो परिणाम, जाणून 'ही' गंभीर लक्षणं....)

 

Web Title: Corona virus : Threat in india virus can come through plastic packaging beware while you shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.