Corona Virus: समजून घ्या ‘कोरोना’; कोरोनाचे ‘पॅण्डेमिक’ म्हणजे नेमके काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 02:20 AM2020-03-14T02:20:58+5:302020-03-14T06:36:44+5:30
महामारी याचा अर्थ एवढाच, की हा आजार आता जगभरात सर्व देशांमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे
कोरोना हा व्हायरस असून ज्याप्रमाणे सर्दी, खोकला हा त्रास व्हायरसमुळे होतो. तसाच कोरोनामुळे ताप, श्वास घेण्यास होतो. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला पॅण्डेमिक (सर्वव्यापी किंवा महामारी) आजार म्हणून जाहीर केले आहे. जो आजार आंतरराष्ट्रीय सीमा पार करून इतर अनेक देशांत कमी वेळात पसरतो त्याला पॅण्डेमिक असे म्हटले जाते. जो विषाणू नवा असतो, संसर्गजन्य असतो आणि एकापेक्षा जास्त देशांत कमी वेळात पसरतो तेव्हा महामारी जाहीर केली जाते. महामारी याचा अर्थ एवढाच, की हा आजार आता जगभरात सर्व देशांमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे. परंतु या आजारामुळे खूप जास्त मृत्यू होणार आहेत, असे मात्र नाही. महामारी जाहीर करण्याचा हेतू ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक देशांमध्ये शासन व सर्वसामान्य लोकांच्या पातळीवर सतर्कता वाढवणे हा असतो. - डॉ. अमोल अन्नदाते