Corona Virus Update: कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडला; 600 वेळा बदलला; XE वरून डब्ल्यूएचओने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 10:54 AM2022-04-02T10:54:14+5:302022-04-02T10:54:34+5:30
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या XE प्रकाराबाबत इशारा दिला आहे. WHO ने सांगितले की XE प्रकार पहिल्यांदा युनायटेड किंगडममध्ये 19 जानेवारी रोजी आढळला होता.
कोरोनाच्या डेल्टाक्रॉन व्हेरिअंटने जगभरात पुन्हा हाहाकार उडविला असताना आता नव्या व्हेरिअंट सापडला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याची घोषणा केली असून याचे नाव XE असे ठेवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्हेरिअंटच्या संक्रमणाचा वेग हा BA.2 व्हेरिअंटच्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक आहे.
डब्लूएचओ नुसार आतापर्यंत कोरोनाचे तीन हायब्रिड व्हेरिअंट सापडले आहेत. यामध्ये पहिला XD, दुसरा XF आणि तिसरा XE आहे. यापैकी पहिला आणि दुसरा व्हेरिअंट डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून तयार झाला आहे. तर तिसरा व्हेरिअंट ओमायक्रॉनचा सबव्हेरिअंटचा हायब्रिड स्ट्रेन आहे. ब्रिटीश हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या संशोधनात हे प्रकार सापडले आहेत.
XD फ्रेंच डेल्टा प्रकार हा X BA.1 वंशाचा सर्वात नवीन आहे. त्यात BA.1 चे स्पाइक प्रोटीन आणि डेल्टाचा जीनोम आहे. सध्या यात 10 पेक्षा जास्त सिक्वेंसचा समावेश आहे. XF ब्रिटिश डेल्टा x BA.1 वंशाशी संबंधित आहे. त्यात BA.1 चे स्पाइक आणि स्ट्रक्चरल प्रथिने आहेत परंतु डेल्टाच्या जीनोमच्या फक्त पाचवा हिस्सा आहेत. XE प्रकार देखील ब्रिटिश डेल्टा BA.1 x BA.2 वंशाशी संबंधित आहे. यात BA.2 मधील स्पाइक आणि स्ट्रक्चरल प्रथिने आहेत परंतु त्यात BA.1 च्या जीनोमचा फक्त पाचवा भाग आहे. त्यात सध्या शेकडो सिक्वेन्स आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या XE प्रकाराबाबत इशारा दिला आहे. WHO ने सांगितले की XE प्रकार पहिल्यांदा युनायटेड किंगडममध्ये 19 जानेवारी रोजी आढळला होता. आतापर्यंत 600 सिक्वेंस नोंदवले गेले आहेत. प्राथमिक अभ्यासानुसार, XE प्रकार BA.2 पेक्षा 10 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. तथापि, आम्हाला या प्रकाराबद्दल अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे.