भारतात कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांवर; कोरोनापासून बचावासाठी WHO नं सांगितले प्रभावी उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 06:35 PM2020-07-17T18:35:44+5:302020-07-17T18:44:12+5:30
CoronaVirus : आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार असून कोरोनाला हलक्यात घेता येणार नाही. आशियात रोज कोविड १९ च्या संक्रमणाच्या ५५ हजारांपेक्षा जास्त केसेस समोर येत आहेत.
गेल्या २४ तासात कोरोन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ३४,९५६ नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर ६८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी दिलेल्या माहितीनुसार आता आधीसारखे सामान्य जीवन जगणं कठीण आहे. आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार असून कोरोनाला हलक्यात घेता येणार नाही. आशियात रोज कोविड १९ च्या संक्रमणाच्या ५५ हजारांपेक्षा जास्त केसेस समोर येत आहेत. त्यातील सर्वाधिक रुग्ण हे भारताचे आहेत. जास्त लोकसंख्या असलेल्या देशात कोरोना टेस्ट ज्या वेगाने व्हायला हव्यात तश्या आपल्या देशात होताना दिसून येत नाहीत. टेस्टिंगमध्ये भारत ३२ व्या क्रमांकावर आहे.
या गोष्टी लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलेले उपाय लक्षात घेणं गरजेचं आहे. कोरोनापासून बचावासाठी WHO ने मास्कचा आणि सॅनिटायजरचा वापर करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला आहे. देशात नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. तरीसुद्धा देशात अनेक ठिकाणी सोशस डिस्टेंसिंगचं पालन केलेलं दिसत नाही. त्यामुळे संक्रमण वाढत आहे. WHO कडून सॅनिटायजचा वापर वारंवार साबणाने हात धुणं आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन हे मुख्य तीन उपाय सांगितले आहेत.
या आधीसुद्धा जागतिक आरोग्य संघटनेनं एका व्हिडीओच्या माध्यमातून खाद्यपदार्थ व्हायरस आणि बॅक्टेरिया मुक्त कसे ठेवता येतील याबाबत सांगितले होते. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार जर कोणत्याही व्यक्तीने दुषित अशा अन्नाचे सेवन केले तर पोटदुखी, अतिसार, अपचन, उलट्या, ताप यांसारख्या समस्या उद्भवतात. अनेकदा प्रदुषित अन्नाचे सेवन केल्यामुळे मृत्यूचाही सामना करावा लागतो.पॅथोजेनिक माइक्रोऑर्गेनिजम शरीरात वेगाने वाढून आपली संख्या वाढवतात. त्यामुळे आरोग्यांच्या समस्या जाणवतात. या स्थितीपासून बचाव करण्यासाठी काही गाईडलाईन्स फॉलो करणं गरजेचं आहे
काही खाण्याआधी किंवा अन्नपदार्थांना स्पर्श करण्यासाठी हात स्वच्छ धुवा,
फ्रिजमध्ये उरलेले अन्न ठेवताना कच्च आणि शिजलेले पदार्थ वेगवेगळे ठेवा. त्यामुळे किटाणू निर्माण होणार नाहीत.
जेवण बनवताना चांगले शिजवून मगच सेवन करा. अर्धवट शिजलेले अन्न शरीरासाठी घातक ठरू शकते.
योग्य तापमानात अन्न साठवून ठेवा. खाद्यपदार्थ विकत घेताना पाकिटावर लिहिलेला मजकून नीट वाचा.
चांगल्या दर्जाच्या मसाल्यांचा वापर करा.
त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास
कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण