कोरोनाची लस दिल्यानंतर दिसू शकतात हे ५ साईड इफेक्टस; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 04:51 PM2020-12-14T16:51:53+5:302020-12-14T17:03:57+5:30
Corona Vaccine News & Latest Updates : सगळ्यात महत्वाच्या साईड इफेक्टमध्ये एलर्जीचा समाावेश आहे. कारण अनेक नामवंत कंपन्यांच्या लसीच्या चाचण्यांदरम्यान स्वयंसेवकांवर साइड इफेक्ट्स दिसून आले आहेत.
(image Credit- Rauters)
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक रात्रंदिवस लसीवर काम करत आहेत. सध्याच्या स्थितीत ज्या कंपनीच्या लसी सुरक्षित आणि प्रभावी मानल्या जात आहेत. त्या लसी तसंच लसीकरणाबाबत तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिल आहे. कोरोना व्हायरसची लस दिल्यानंतर एलर्जीचा धोका वाढू शकतो. असं डॉक्टरांचे मत आहे.
सगळ्यात महत्वाच्या साईड इफेक्टमध्ये एलर्जीचा समाावेश आहे. कारण अनेक नामवंत कंपन्यांच्या लसीच्या चाचण्यांदरम्यान स्वयंसेवकांवर साइड इफेक्ट्स दिसून आले आहेत. काही स्वयंसेवकांमध्ये वेगळ्या प्रकारचे साईड इफेक्ट्स दिसून आले होते. या समस्यांचा सामाना करण्यासाठी आपण पूर्णपणे तयार असायला हवं. आज आम्ही तुम्हाल अशा साईड इफेक्ट्सबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे डॉक्टरर्स सगळ्यात जास्त चिंतेत आहेत.
ताप येणं आणि थंडी वाजणं-
मॉडर्नाची लस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये जास्त थंडी वाजल्याचे लक्षण दिसून आले होते. लस दिल्यानंतर काही तासांनी एका व्यक्तीला १०२ डिग्री ताप होता. त्यासाठी लस निर्मिती कंपन्यांनी या दोन साईड इफेक्ट्सकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जेव्हा शरीरात एंटीबॉडी तयार होतात तेव्हा व्यक्तीला सौम्य किंवा जास्त तापाची लक्षणं दिसून येतात.
डोकेदुखी-
लस दिल्यानंतर डोकेदुखीचा त्रास देखील एक लक्षण आहे ज्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे. लसीकरणानंतर तीव्र डोकेदुखी होऊ शकते. याशिवाय मानसिक ताण, चिडचिडेपणा आणि मनःस्थिती बदलणे यासारख्या समस्या देखील उद्भवतात. कोणत्याही प्रकारच्या संसर्गात, लसीकरणानंतर 50 टक्के रुग्णांना असा त्रास होतो.
उलटी, मळमळणं-
मनुष्याच्या पचनसंस्थेवर लसीचा प्रभाव असू शकतो. मे मध्ये मॉडर्नाच्या लसीचा डोस घेण्यासाठी निवडलेल्या एका स्वयंसेवकाची प्रकृती लस दिल्यानंतर बर्याच तासांपर्यंत बरी नव्हती.या स्वयंसेवकाला उलट्या, मळमळ, चिंताग्रस्तपणा आणि पोटात गोळा येणे अशी लक्षणे जाणवली.
सॅनिटरी नॅपकिन बदलण्याआधी, नंतर 'असा' निष्काळजीपणा करत असाल; तर वेळीच सावध व्हा
मासपेशीतील वेदना-
ज्या ठिकाणी लसीद्वारे रुग्णाला इंजेक्शन दिले जाते त्या ठिकाणी बहुधा स्नायू दुखणे आणि सूज येणे ही समस्या उद्भवते. त्या भागात लालसरपणा किंवा पुरळ देखील उद्भवू शकते. मॉडर्ना, फायझर आणि ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका या सर्वांनी त्यांच्या लसींमध्ये समान साईड इफेक्ट्स नोंदवले आहेत.
सावधान! इम्यूनिटी वाढवणाऱ्या 'या' पदार्थांमुळे वाढतोय स्टोनचा धोका; वेळीच ६ पदार्थांचे सेवन टाळा
मायग्रेन-
डोकेदुखी किंवा मायग्रेन देखील एक समस्या लसीकरणानंतर दिसू शकते. एका अहवालानुसार फायझरच्या लसीच्या चाचणीत भाग घेतलेल्या एका स्वयंसेवकामध्ये लसीकरणानंतर मायग्रेनची तीव्र लक्षणांची नोंद केली होती. त्यानंतर बर्याच स्वयंसेवकांना लस घेण्यापूर्वी एक दिवस सुट्टी घेण्यास सांगितले आणि भरपूर विश्रांती घेण्यास सांगितली होते. ही लस मानसांमध्ये मायग्रेनच्या समस्येसाठी कारणीभूत ठरू शकते.