Coronary Artery Disease : काय आहे हृदयासंबंधी ‘ट्रिपल वेसेल डिजीज’आजार?, यामुळेच येतो हार्ट अटॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 01:58 PM2022-02-02T13:58:37+5:302022-02-02T14:07:46+5:30

Coronary Artery Disease : मनुष्याच्या शरीरात हृदय एक फारच महत्वाचा अवयव आहे. ज्याने संपूर्ण शरीरात रक्ताचा सप्लाय केला होता. हृदयात रक्त परत येतं ते धमन्यांच्या माध्यमातून.

Coronary Artery Disease : How to avoid triple vessels disease, heart attack | Coronary Artery Disease : काय आहे हृदयासंबंधी ‘ट्रिपल वेसेल डिजीज’आजार?, यामुळेच येतो हार्ट अटॅक

Coronary Artery Disease : काय आहे हृदयासंबंधी ‘ट्रिपल वेसेल डिजीज’आजार?, यामुळेच येतो हार्ट अटॅक

googlenewsNext

भारतात हृदयरोग फारच कॉमन झाला आहे. याचं कारण आहे की, अनहेल्दी लाइफस्टाईल आणि तेलयुक्त पदार्थाचं अधिक सेवन. अशाप्रकारच्या लाइफस्टाईलमुळे हार्ट अटॅकचा धोकाही अधिक वाढतो. ज्याने 'ट्रिपल वेसेल डिजीज' (Triple Vessel Disease) ला जन्म मिळू शकतो. त्यामुळे चांगलं होईल की तुम्ही सतर्क रहा.

का येतो हार्ट अटॅक?

मनुष्याच्या शरीरात हृदय एक फारच महत्वाचा अवयव आहे. ज्याने संपूर्ण शरीरात रक्ताचा सप्लाय केला होता. हृदयात रक्त परत येतं ते धमन्यांच्या माध्यमातून. अनेकदा रक्तात कोलेस्ट्रॉल वाढल्याने यात फॅट जमा होऊ लागतं आणि आर्टरीजमध्ये अडथळा निर्माण होऊ लागतो. यालाच ‘कोरोनरी आर्टरी डिजीज’ (Coronary Artery Disease) असं म्हटलं जातं. याच्यामुळेच हार्ट अटॅक येतो.

'ट्रिपल वेसेल डिजीज' काय आहे?

मेडिकल एक्सपर्ट्सनुसार, ‘कोरोनरी आर्टरी डिजीज’ (Coronary Artery Disease) एक मोठं खतरनाक रूप आहे. हृदयात रक्त पोहोचवण्याचं काम ३ मोठ्या धमण्या करतात आणि जेव्हा या तीन धमण्या ब्लॉक होतात तेव्हा याला ‘ट्रिपल वेसेल डिजीज’ (Triple Vessel Disease) नावाने ओळखलं जातं. यामुळे छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रासाची समस्या होते. मग हार्ट अटॅक येतो.

अ‍ॅंजियोप्लास्टी काय आहे? 

‘ट्रिपल वेसेल डिजीज’ (Triple Vessel Disease) चा उपचार अ‍ॅंजिओप्लास्टीच्या माध्यमातून होतो. ही हृदयाची एक सर्जरी आहे. ज्याला बॅलून अ‍ॅंजियोप्लास्टी (Balloon Angioplasty) आणि परक्यूटेनियस ट्रांसल्यूमिनाल अअ‍ॅंजियोप्लास्टी (PTA) च्या नावाने ओळखलं जातं. यात धमण्यांच्या माध्यमातून रक्ताचा सप्लाय ठीक केला जातो.

'ट्रिपल वेसेल डिजीज' कसा टाळाल?

तेलयुक्त पदार्थ कमी खावीत

हेल्दी डाएटचा आहारात समावेश करा

वाढणारं वजन कमी करा

रेग्युलर एक्सरसाइज करा

ब्लड प्रेशर वाढू देऊ नका

मद्यसेवन करू नका

ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवा

टेंशन कमी करा

(टिप : वरील लेखातील सल्ले किंवा माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहेत. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. तुम्हाला हृदयासंबंधी काहीही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.)

Web Title: Coronary Artery Disease : How to avoid triple vessels disease, heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.