CoronaVaccine : संक्रमण होतंच मग कोरोनाची लस का घ्यायची? तज्ज्ञांनी सांगितला लस घेण्याचा सगळ्यात मोठा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 07:53 PM2021-04-29T19:53:01+5:302021-04-29T20:04:17+5:30
CoronaVaccine : वृद्धांना कोरोना झाल्यास त्यांचं हॉस्पिटलायझेशन रोखण्यासाठी लस प्रभावी ठरत आहेत.
कोरोना संसर्गानं जगभरात पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारकडून लोकांना वारंवार कोरोनाच्या नियमाचे पालन करण्याबाबत आणि मास्कच्या वापराबाबत आवाहन केलं जात आहे. कोरोना लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झालाच, तर हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागण्याची शक्यता कमी होते आणि मृत्यूचा धोका घटतो, असा दावा वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधनात करण्यात आला आहे.
फेडरल स्टडीमधून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या माहामारीत अमेरिकेत फायझर (Pfizer) आणि मॉडर्ना (Moderna) कंपनीच्या लसी लसीकरणासाठी वापरल्या जात आहेत. वृद्धांना कोरोना झाल्यास त्यांचं हॉस्पिटलायझेशन रोखण्यासाठी लस प्रभावी ठरत आहेत. अमेरिकेच्या 'सेंटर फॉर डिसीज कंट्रोलअँड प्रिव्हेंशन'च्या रिपोर्टनुसार यात काहीही आश्चर्य नाही. मात्र या लसीचा अपेक्षित परिणाम साध्य होत नसल्याचं पाहून लोक अस्वस्थ होत आहेत. या दोन्हीही लशी कोविडमुळे निर्माण होत असलेल्या गंभीर आजारावर निर्बंध आणण्यास मदत करतात.
बाहेरून कोणीही आल्यास तुमच्या घरातही होऊ शकतो कोरोनाचा शिरकाव; CDC नं दिल्या गाईडलाईन्स
लसीचे दोन्ही डोस घेऊन झालेल्या 65 वर्षांवरच्या व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्यास त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची शक्यता लस न घेतलेल्या व्यक्तींच्या तुलनेत 94 टक्के कमी होती. ज्यांनी लशीचा एक डोस घेतला आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागण्याची शक्यता एकही डोस न घेतलेल्यांच्या तुलनेत 64 टक्के कमी असल्याचं अभ्यासातून दिसून आलं आहे. संक्रमण गंभीर होण्याचा धोका वाढत्या वयानुसार वाढत जातो. वृद्धांमध्ये कोविड गंभीर रूप धारण करण्याची शक्यता अधिक असल्यामुळे त्यांना लसीकरणात प्राधान्य दिलं जात आहे.
लक्षणं असतानाही या ५ कारणांमुळे तुमची कोरोनाची टेस्ट येऊ शकते निगेटिव्ह; वेळीच सावध व्हा
ब्रिटनच्या पब्लिक हेल्थ इंग्लंड (PHE) या संस्थेने नव्याने केलेल्या अभ्यासातल्या निष्कर्षांनुसार, ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेका किंवा फायझर-बायोएनटेक यांच्या लशींचा एक डोस घेतला तरी कोरोना संक्रमणाची तीव्रता कमी होते. राष्ट्रीय आरोग्य सेवेअंतर्गत सध्या लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. ज्या लोकांना लसीचा एक डोस घेतल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत संसर्ग झाला होता, त्यांच्याकडून लस न घेतलेल्या व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता 38 ते 49 टक्क्यांनी कमी झाल्याचं आढळून आलं.