CoronaVaccine: कोव्हॅक्सीन अधिकांश व्हेरिएन्टवर प्रभावशाली, डबल म्यूटेंटचाही करू शकते सामना, ICMRचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 03:39 PM2021-04-21T15:39:51+5:302021-04-21T15:42:40+5:30

केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने भारत बायोटेक कम्पनीला 65 कोटी रुपयांची मदत अनुदानाच्या स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला आहे. (Covaxin)

CoronaVaccine: Covaxin is effective on most variants of corona says icmr | CoronaVaccine: कोव्हॅक्सीन अधिकांश व्हेरिएन्टवर प्रभावशाली, डबल म्यूटेंटचाही करू शकते सामना, ICMRचा दावा

CoronaVaccine: कोव्हॅक्सीन अधिकांश व्हेरिएन्टवर प्रभावशाली, डबल म्यूटेंटचाही करू शकते सामना, ICMRचा दावा

Next

नवी दिल्ली - देशात कोरोना स्क्रमितांचा आकडा रोजच्या रोज नवा विक्रम करत आहे. कोरोनाला पराभूत करण्यासाठी देशात लसीकरण अभियानही वेगात सुरू आहे. देशात आतापर्यंत 13 कोटीहून अधिक नागरिकांना कोरोना लशीचा डोस देण्यात आला आहे. यातच आता कोव्हॅक्सीनसंदर्भात मोठे वृत्त आले आहे. कोरोना व्हॅक्सीन कोव्हॅक्सीन ही अधिकांश व्हेरिएन्टवर प्रभावशाली आहे, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आपल्या रिसर्चमध्ये म्हटले आहे.  (CoronaVaccine: Covaxin is effective on most variants of corona says icmr)

CoronaVirus : कोरोनाचा डबल म्यूटेंट व्हेरिएंट किती घातक? लस ठरेल का परिणामकारक? जाणून घ्या

कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएन्टचा सामना करण्याची क्षमता -
आयसीएमआरने आपल्या संशोधनात दावा केला आहे, की कोव्हॅक्सीन कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएन्टचा सामना करू शकते. एवढेच नाही, तर  ही व्हॅक्सीन कोरोनाच्या डबल म्यूटेंट स्ट्रेनचाही सामना करण्यात सक्षम आहे, असेही आयसीएमआरने म्हटले आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सीन (COVAXIN) नावाची लस ही आतापर्यंत स्वदेशात तायर झालेली एकमेव लस आहे.

मोदी सरकार लशीच्या उत्पादनाची क्षमता वाढवणार - 
भारतातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने आता या स्वदेशी लशीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी पाऊल उचलले आहे. आत्मनिर्भर भारत मिशन 3.0 अंतर्गत चालविण्यात येत असलेले 'मिशन कोविड सुरक्षा'च्या माध्यमाने भारतात तयार झालेल्या लशीचा विकासात आणि उत्पादनात तेजी आणण्यासाठी मदत देण्यासंदर्भातील तरतूद करण्यात आली आहे. 

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

या अंतर्गत केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने भारत बायोटेक कम्पनीला 65 कोटी रुपयांची मदत अनुदानाच्या स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला आहे. या पैशांचा वापर बेंगळुरूमध्ये तयार करण्यात आलेल्या भारत बायोटेकच्या नव्या सेंटरमध्ये लशीच्या उत्पादनाची क्षमता वाढविण्यासाठी करण्यात येईल.

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

Web Title: CoronaVaccine: Covaxin is effective on most variants of corona says icmr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.