CoronaVaccine News : लस घेतल्यानंतर घ्यावी लागणार या ८ गोष्टींची काळजी; नाहीतर लस घेऊनही होणार नाही बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 01:51 PM2021-04-07T13:51:45+5:302021-04-07T14:04:09+5:30
CoronaVaccine News : जर तुम्हीसुद्धा कोरोनाची लस घेतली असेल किंवा घेणार असाल तर काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. तरच कोरोनापासून तुमचा बचाव होऊ शकतो.
कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वेगाने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. लोकांना लवकरात लवकर लस देण्याच्या कामाची सुरूवात करण्यात आली आहे. जर तुम्हीसुद्धा कोरोनाची लस घेतली असेल किंवा घेणार असाल तर काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. तरच कोरोनापासून तुमचा बचाव होऊ शकतो.
लगेचच कामाला सुरूवात करू नका
लस घेतल्यानंतर लगेचच कामाला सुरूवात करू नका. २ ते ३ दिवस आराम करा. लस घेतल्यानंतर २४ तासांनी साईड इफेक्ट्स दिसायला सुरूवात होते. म्हणून लस घेतल्यानंतर कमीतकमी दोन ते तीन दिवस आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या.
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा
जर तुम्ही सध्या लसीचा पहिला डोस घेतला असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. जोपर्यंत लसीचा दुसरा डोस मिळत नाही, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.
प्रवास करू नका
कोरोनाचं संक्रमण पुन्हा एकदा वेगानं पसरत आहे. त्यामुळे तुम्ही जरी लस घेतली असेल तरीसुद्धा प्रवास करणं टाळा. अमेरिकेतील सेंटर फॉर डीजीज कंट्रोल ऑफ प्रिवेंशनने दिलेल्या माहितीनुसार लस घेतल्यानंतर प्रवास करणं टाळायला हवं.
दारू, सिगारेटपासून लांब राहा
जर तुम्ही दारू किंवा सिगारेट पीत असाल तर लसीकरणानंतर यापासून लांब राहा. कारण लसीकरणानंतर कमीत कमी तीन महिने तुम्ही मद्यपान, धुम्रपान टाळायला हवं. याशिवाय तळलेले पदार्थ खाण्यापासून लांब राहा.
डॉक्टरांच्या संपर्कात राहा
जर तुम्हाला कोणतीही एलर्जीक समस्या असेल तर सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण लस घेतल्यानंतर अनेकदा साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत. अशावेळी घाबरून न जाता तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
मास्क न लावता बाहेर वावरू नका
लस घेतल्यानंतर मास्क लावायची गरज नाही हा विचार चुकीचा आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरच शरीरात एंटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला कोरोना संक्रमणाचं शिकार बनवू शकतो.
स्वतःला हायड्रेट ठेवा
लस घेतल्यानंतर आणि आधी स्वतःला हायड्रेड ठेवणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्या आहारात जास्तीत जास्त पाणी, फळं आणि भाज्यांचा समावेश करा. त्यामुळे शरीर आतून चांगलं राहण्यास मदत होईल.
साध्या वाटणाऱ्या 'या' ७ लक्षणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो हृदयाचा गंभीर आजार; वेळीच सावध व्हा
व्यायाम टाळा
लस घेतल्यानंतर तुमच्या हातांना वेदना होऊ शकतात. म्हणून लस घेतल्यानंतर काही दिवस वर्कआऊट करणं टाळा. अति व्यायाम केल्यानं तुमच्या हातांच्या वेदना जास्त वाढू शकतात.