CoronaVaccine News : आनंदाची बातमी! सप्टेंबरमध्ये आणखी एक कोरोना लस येणार?; सीरम इंस्टिट्यूटकडून चाचणीला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 08:21 PM2021-03-27T20:21:28+5:302021-03-27T20:32:06+5:30
CoronaVaccine News & latest Updates : या वर्षी सप्टेंबरपर्यंत ही लस दाखल होऊ शकते. ऑगस्ट २०२० मध्ये अमेरिकन लस कंपनी नोवावॅक्सनं सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियासह लायसेंस कराराची घोषणा केली होती.
कोरोनाच्या लसीकरणाला (Corona vaccination) जानेवारीपासून सुरूवात झाल्यानं लोकांमध्ये दिलासायक वातावरण होतं. माहामारीचा धोका पूर्णपणे टळला असं लोकांना वाटत होतं. पण पुन्हा एकदा कोरोनाची (Corona patients) रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे. दरम्यान कोरोना लसीबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे.
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ आदर पूनावाला यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोना व्हायरसची लस, कोवॅक्सिनची वैद्यकिय चाचणी सुरू होणार आहे. या वर्षी सप्टेंबरपर्यंत ही लस दाखल होऊ शकतो. ऑगस्ट २०२० मध्ये अमेरिकन लस कंपनी नोवावॅक्सनं सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियासह लायसेंस कराराची घोषणा केली होती.
Covovax trials finally begin in India; the vaccine is made through a partnership with @Novavax and @SerumInstIndia. It has been tested against African and UK variants of #COVID19 and has an overall efficacy of 89%. Hope to launch by September 2021! https://t.co/GyV6AQZWdV
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) March 27, 2021
नोवावॅक्सनं हा करार कोविड १९ लस ’ एनवीएक्स-सीओ2373 सह विकासासाठी केला होता. ही लस भारतासह मध्यम आणि कमी लोकसंख्येच्या देशात उपलब्ध करून दिली जाणार आहे. पूनावालांनी ने ट्वीट केलं आहे. त्यात नमुद करण्यात आलेल्या माहितीनुसार ''कोवोवॅक्सची वैदयकिय चाचणी भारतात सुरू होणार आहे. या लसीचा विकास नोवावॅक्स आणि सीरम इंस्टिट्यूटद्वारे केला जाणार आहे.
‘फायझर’कडून १२ वर्षांखालील मुलांवर लसीची चाचणी सुरू; यावर्षी दुसऱ्या सहामाहीत अहवाल अपेक्षित
आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनविरूद्ध लढण्यासाठी किती प्रभावी ठरते. हे या लस चाचणीच्या माध्यमातून पाहिलं जाणार आहे. या लसीची क्षमता ८९ टक्के असल्याचं सांगितलं जात आहे. ही लस सप्टेंबर २०२१ पर्यंत तयार होऊ शकते.'' CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या दीर्घकाळ संसर्गानंतर 'या' आजारांचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा