CoronaVaccine News : धक्कादायक! AstraZeneca ची लस घेतल्यानंतर तयार झाल्या रक्ताच्या गाठी; तब्बल ७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 05:45 PM2021-04-04T17:45:07+5:302021-04-04T17:57:50+5:30
CoronaVaccine News : लस घेतल्यानंतर 30 जणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या आणि त्यापैकी सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही माहिती ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटर ने दिली आहे.
कोरोनाची लस आल्यानंतर लोकांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झालं होतं. पण लसीचे साईड इफेक्ट्स काही प्रमाणात दिसून आल्यामुळे लस घ्यायची की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण आहे. दरम्यान एक्स्ट्राजेनका लसीबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ब्रिटनमध्ये Oxford-AstraZeneca कोरोना लस घेतल्यानंतर सात जणांना आपला जीव गमवावा लागल्याचं समोर आलं आहे. ही लस घेतल्यानंतर 30 जणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या आणि त्यापैकी सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही माहिती ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटर ने दिली आहे.
युरोपातील अन्य काही देशांमधून एक्स्ट्राजेनकाच्या लसीबाबत तक्रारी येत होत्या. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांनी जगभरातील देशांना अॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) लस वापरणे सुरू ठेवण्याची शिफारस केली. लसीबाबत अनेकांच्या मनात साशंकता असल्यामुळे लसीच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर लसीच्या सुरक्षेकडेही लक्ष देत आहोत, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं.
दरम्यान जागतिक आरोग्य संघटना युरोपचे ड्रग रेग्युलेटर आणि AstraZeneca यांनी ही लस पूर्णपणे सुरक्षित असून लसीच्या वापरामुळे रक्ताच्या गुठळ्या किंवा मेंदूतील रक्तस्त्राव होण्याचा धोका असल्याचा पुरावा मिळाला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. WHO ने देखील AstraZeneca सांगितलं होतं की, लस आणि रक्ताच्या गुठळ्या याचा कोणताही संबंध असलेली एकही रुग्ण आढळलेला नाही. आता या देशात लोकांनी लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची तक्रार केली आहे.
#BREAKING Seven deaths in UK among AstraZeneca jab recipients after blood clots: medical regulator pic.twitter.com/KgG5FvVAZT
— AFP News Agency (@AFP) April 3, 2021
काही युरोपियन देशांनी या आधीच एक्स्ट्राजेनका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीद्वारे विकसित केलेल्या कोविड 19 लसीच्या वापरावर काही प्रमाणात बंदी घातली होती. ही लस घेतल्यानंतर डेन्मार्कमधील एका ६० वर्षीय महिलेचा मृत्यू देखील झाला आहे. आता एक्स्ट्राजेनकाची लस घेतल्याने ७ जणांचा मृत्यू झाल्याचं स्वत: ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटरने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये या लसीवरच्या वाापरावर बंदी घालण्यात येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
लसीकरणानंतर दिसणारे साईड इफेक्ट्स
सीडीसीनं दिलेल्या माहितीनुसार हात पाय थरथरणं, थकवा, उलटी, ताप, सुज आणि वेदना, कोरोना लसीचे अनेक साईड इफेक्ट्स आहेत. काही लोकांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर वेदना आणि सुजेचा अनुभव केला आहे. जास्तीत जास्त लोकांना त्वचा लाल होणं, खाज येणं. या समस्यांचा सामना करावा लागला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लस घेतल्यानंतर काहीवेळ आराम करायला हवा. जेणेकरून लकरात लवकर रिकव्हर होत येईल.
महिलांमध्ये दिसणारे साईड इफेक्ट्स जास्त
एका नव्या संशोधनानुसार, पुरुषांपेक्षा स्त्रियांना लसीचे दुष्परिणाम होण्याचा धोका जास्त असतो. याची पडताळणी करण्यासाठी, रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रनं (सीडीसी) केलेल्या अभ्यासानुसार वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना लस देण्यात आल्या. एकूण लस घेतलेल्या महिलांचे दुष्परिणाम 79. टक्के होते.
कोविड शॉट घेतलेल्या 44 टक्के स्त्रिया अशा होत्या. ज्यांनी अॅनाफिलेक्टिक प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान या महिलांना फाइझर लसीचे शॉट्स देण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेव्हा ही लस महिलांच्या शरीरात पोहोचते आणि काम करण्यास प्रारंभ करते तेव्हा महिलांची रोगप्रतिकारक शक्ती वेगाने प्रतिसाद देते ज्यामुळे त्यांना लवकर दुष्परिणाम होतात. CoronaVaccine News: लस घेतल्यानंतरही लोक येताहेत कोरोना पॉझिटिव्ह?; समोर आलं खरं कारण
एकदा कोरोना झालेल्या लोकांवर दुष्परिणाम जास्त
झीओओवर (कोविड सिमेंटम अॅप) आधारित अभ्यासावनुसार फाइजर शॉट्स मिळवलेल्यांपैकी जवळजवळ एक तृतीयांश लोकांना पूर्वी कोविड होता. ते म्हणाले की ही लस दिल्यावर थंडी वाजण्यासह संपूर्ण शरीरावर परिणाम त्यांच्यावर झाला. ज्यांना पूर्वी कोविड झाला नव्हता ते लसीकरणानंतरही पूर्णपणे सामान्य होते. पोषक तत्वाचं 'पावरहाऊस' ठरतं बीट; उन्हाळ्यात बीटाच्या सेवनानं शरीराला मिळतील हे ६ फायदे