CoronaVaccine: कोरोनाविरोधात या लसीचा एक डोसदेखील पुरेसा; भारतातही आहे उपलब्ध...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 03:44 PM2021-07-14T15:44:31+5:302021-07-14T15:48:10+5:30

Sputnik V single dose enough: खरेतर कोरोना लसीचे दोन डोस कोरोनाविरोधात लढण्यास जास्त परिणामकारक असल्याचे आढळले आहे. मात्र, देशातील ४ टक्के लोकांनाच लसीचे दोन डोस मिळाले आहेत. अनेक ठिकाणी लसीसाठी मारमारी आहे. अनेकांना कोव्हॅक्सिनचे ३० दिवस किंवा कोव्हिशिल्डचे ८४ दिवस होऊन गेले तरी दुसरा डोस मिळालेला नाहीय.

CoronaVaccine: Single dose of Sputnik V made strong antibody response; Also available in India ... |  CoronaVaccine: कोरोनाविरोधात या लसीचा एक डोसदेखील पुरेसा; भारतातही आहे उपलब्ध...

 CoronaVaccine: कोरोनाविरोधात या लसीचा एक डोसदेखील पुरेसा; भारतातही आहे उपलब्ध...

Next

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona third wave) शक्यतेने जगाला मोठ्या संकटात टाकले आहे. डेल्टा व्हेरिअंट १२० हून अधिक देशांमध्ये आढळल्याने खळबळ उडालेली आहे. दुसरीकडे कोरोना लसीची (Corona Vaccine) प्रचंड टंचाई भारतासह जगभरातील देशांना सतावू लागली आहे. यामुळे कोरोनाला कसे थोपवायचे असा प्रश्न मोठमोठ्या तज्ज्ञांना पडलेला असताना एक दिलासा देणारे संशोधन समोर आले आहे. एका देशाच्या कोरोना लसीचा एकच डोस (Corona vaccine single dose) कोरोनाविरोधात लढण्यास पुरेसा असल्याचे आढळले आहे. महत्वाचे म्हणजे ही लस भारतात देखील उपलब्ध आहे. (Single dose of Sputnik V Covid vaccine triggers strong antibody response: Study) 

Sputnik V Exclusive: रशियात राहणाऱ्या ठाणेकरानं घेतलेत Sputnik V चे दोन्ही डोस; जाणून घ्या त्यांचा अनुभव अन् लसीचे साईड इफेक्ट

खरेतर कोरोना लसीचे दोन डोस कोरोनाविरोधात लढण्यास जास्त परिणामकारक असल्याचे आढळले आहे. मात्र, देशातील ४ टक्के लोकांनाच लसीचे दोन डोस मिळाले आहेत. अनेक ठिकाणी लसीसाठी मारमारी आहे. अनेकांना कोव्हॅक्सिनचे ३० दिवस किंवा कोव्हिशिल्डचे ८४ दिवस होऊन गेले तरी दुसरा डोस मिळालेला नाहीय. आलेच तर 100 ते 200 डोस प्रत्येक केंद्रावर मिळत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या बुस्टर डोस देण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. आधीच पहिला, दुसरा डोस मिळालेला नसताना तिसरा डोस कुठून देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सेल रिपोर्ट्स मेडिसिन जर्नलने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासामध्ये रशियाची लस स्पुतनिक व्हीचा (Sputnik V) एक डोस कोरोना विरोधात जबरदस्त अँटीबॉडी बनविते असे समोर आले आहे. हा अभ्यास लसीची टंचाई असलेल्या देशांसाठी महत्वाचा ठरणार आहे. भारतासाठी देखील हे महत्वाचे आहे, कारण स्पुतनिक व्ही ची लस मिळू लागली आहे. तसेच चार-पाच कंपन्या ही लस बनविणार आहेत. 

Covishield: डेल्टा व्हेरिअंट 'बकासूर'! कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना तिसरा डोस द्यावा लागेल; ICMR चा सल्ला

व्हेक्टर व्हॅक्सिन स्पुतनिकचे दोन डोस कोरोना संक्रमणाविरोधात 92 टक्के परिणामकारक आहे. परंतू एक डोस देखील चांगले परिणाम दाखवत असल्याचे दिसले आहे. संशोधकांनी अर्जेंटीनाच्या 289 आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्पुतनिकच्या एक आणि दोन डोसच्या प्रभावाची तुलना केली. यामध्ये कोरोना संक्रमित न झालेल्यांना दुसऱ्या डोसनंतर तीन आठवड्यांनी विशिष्ट इम्युनोग्लोबुलिन जी (आईजीजी) अँटीबॉडी निर्माण झाल्या. तर पहिला डोस घेतलेल्यांपैकी 94 टक्के लोकांमध्ये ही अँटीबॉडी बनली. यामुळे या लसीचा एक डोस देखील कोरोना विरोधात लढण्यास पुरेसा ठरणार असल्याचे मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Web Title: CoronaVaccine: Single dose of Sputnik V made strong antibody response; Also available in India ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.