CoronaVaccine : कोरोनाची लस घेतल्यानंतर आधी तब्येत बिघडली; उपचारादरम्यान ६५ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 09:26 AM2021-03-21T09:26:54+5:302021-03-21T09:37:22+5:30
CoronaVaccineNews & Latest Updates : पाई चालत १० मीटर अंतर पार केल्यानंतर ते लोक पंचायत भवनात पोहोचले.जेठू यांनी आपली पत्नी मोनिकादेवी यांच्या कोरोनाची लस घेतली होती.
देशभरात कोरोना लसीकरणाची (CoronaVaccination) मोहिम जोरात सुरू आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक उत्सुक आहेत. तर काहींच्या मनात भीतीचं वातावरण आहे. कारण लसीनं कोरोना व्हायरसपासून बचाव होत असला तरी त्याचे अनेक साईड इफेक्ट्ससुद्धा आहेत. झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील केशरपूर पंचायतीच्या हल्दीबेरा गावातील रहिवासी असलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
या व्यक्तीचे नाव जेठू कोठवार असून नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार जेठू आपल्या घरापासून १० किलोमीटर दूर पायी चालून कोरोनाची लस घ्यायला पोहोचले होते. त्यांच्यासह त्यांची पत्नीसुद्धा होती. पाई चालत १० मीटर अंतर पार केल्यानंतर ते लोक पंचायत भवनात पोहोचले. जेठू यांनी आपली पत्नी मोनिकादेवी यांच्यासह कोरोनाची लस घेतली होती.
लस घेतल्यानंतर १० मिनिटांनी जेठून कोटवार यांना उल्टीचा त्रास होऊ लागला. त्यांची स्थिती पाहता त्यांना तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयात नेल्यानंतरही तब्येतीत सुधारणा होत नसल्यानं त्यांना आयुर्विज्ञान संस्थान रांची येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी रांची पोहोचण्याआधीच रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.
आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा
या माणसाचे मृत शरीर शव विच्छेदनाचासाठी पाठवण्यात आले होते. शनिवारी कोरोना गाईडलाईन्स अंतर्गत मजिस्ट्रेट शशि डुंगडुंगच्या निरिक्षणाखाली शव विच्छेदन करण्यात आलं. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार जेठू कोटवार यांची प्रकृती चांगली होती. लस घेतल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. शव विच्छेदनाचा रिपोर्ट आपल्यानंतर या प्रकरणाचा पूर्ण खुलासा होण्यास मदत होऊ शकते.