CoronaVaccine : खूशखबर! झायडस कॅडिला लसीला लवकरच मंजुरी! 12 वर्षांवरील मुलांना दिली जाणार लस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 01:41 PM2021-08-09T13:41:16+5:302021-08-09T13:45:28+5:30
झायडसच्या या लसीला मुंजुरी मिळाल्यास, 12 ते 18 वर्षांतील मुलांसाठी ही देशातील पहिलीच व्हॅक्सीन असेल. (CoronaVaccine Zydus cadila)
नवी दिल्ली - भारतातील कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला लवकरच मोठे यश मिळू शकते. झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) कोरोना लसीला लवकरच आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळू शकते. असे झाल्यास, भारतात वापरली जाणारी ही सहावी लस असेल. (CoronaVaccine Zydus cadila vaccine emergency use authorization for 12 years above)
विशेष म्हणजे झायडस कॅडिलाची लस 12 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांसाठी असू शकते. झायडसच्या या लसीला मुंजुरी मिळाल्यास, 12 ते 18 वर्षांतील मुलांसाठी ही देशातील पहिलीच व्हॅक्सीन असेल. अहमदाबाद येथील झायडस कॅडिला कंपनीने जगातील पहिली DNA बेस्ड कोविड लस बनवली आहे. चाचणीमध्ये त्याच्या यशाची टक्केवारी 77 टक्क्यांपर्यंत नोंदवली गेली आहे.
आतापर्यंत पाच लसींना मंजुरी -
आतापर्यंत भारतात एकूण 5 लसींना मंजुरी देण्यात आली आहे. यांपैकी Covishield, Covaccine आणि Sputnik-V या तीन लसी देशभरात वापरल्या जात आहेत. याशिवाय, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन (सिंगल डोस) लसींना मंजुरी मिळाली आहे. तर आता झायडस कॅडिलाला मंजुरी मिळाल्यास ती देशातील सहावी लस असेल. भारतात आतापर्यंत 50 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
CoronaVirus : कोव्हॅक्सीन घेतलेल्यांची विचित्र कोंडी, टेन्शन वाढलं...! ठोठावला न्यायालयाचा दरवाजा
डिसेंबर 2021 पर्यंत सर्व प्रौढांना लसीचा किमान एक डोस देण्याचे भारत सरकारचे लक्ष्य आहे. तसेच, सप्टेंबरपर्यंत देशात रोज एक कोटी लसी दिल्या जाऊ शकतील, अशी अपेक्षित आहे.