Coronavirus : कोरोना व्हायरसबाबतच्या १० खोट्या गोष्टी, जाणून घ्या त्यांचं सत्य....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 11:01 AM2020-03-09T11:01:04+5:302020-03-09T11:10:21+5:30

सरकारकडून सतत कोरोना व्हायरसबाबत जागरूकता केली जात आहे. पण तरी सुद्धा लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. अनेकप्रकारचे दावे केले जात आहेत.

Coronavirus: 10 misconceptions about coronavirus you must not believe api | Coronavirus : कोरोना व्हायरसबाबतच्या १० खोट्या गोष्टी, जाणून घ्या त्यांचं सत्य....

Coronavirus : कोरोना व्हायरसबाबतच्या १० खोट्या गोष्टी, जाणून घ्या त्यांचं सत्य....

Next

कोरोना व्हायरसचं थैमान थांबायचं नावंच घेत नाहीये. भारतात आतापर्यंत ३४ लोकांना या व्हायरसची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने अजून याने कुणीही दगावल्याची बातमी नाही. सरकारकडून सतत कोरोना व्हायरसबाबत जागरूकता केली जात आहे. पण तरी सुद्धा लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. अनेकप्रकारचे दावे केले जात आहेत. पण त्यात किती तथ्य आहे हे जाणून घेतलं पाहिजे. अशाच काही गैरसमजांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गैरसमज - तापमान वाढल्यावर कोरोना व्हायरस नष्ट होईल.

तथ्य - मुळात याचा काही पुरावा नाहीय. पण जास्त तापमानावर व्हायरसची एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होण्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल. कारण सगळेच व्हायरस उष्णतेबाबत फार संवेदनशील असतात. अशात गरमी वाढल्यावर कोरोना नष्ट होईल याबाबत ठोस असा काही पुरावा सध्याच नाही.

गैरसमज - गरम पाण्याने आंघोळ केल्याने इन्फेक्शनचा धोका कमी होईल.

तथ्य - केवळ गरम पाण्याने तुम्ही कोरोना व्हायरसपासून बचाव करू शकाल यात काहीच तथ्य नाही. इन्फेक्शनपासून बचाव करण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे पुन्हा पुन्हा साबण आणि पाण्याने हात चांगले धुवावे. जर पाण्याने हात धुणे शक्य नसेल तर सॅनिटायजरचा वापर करा. त्यात अल्कोहोलचं ६० ते ७० टक्के प्रमाण असावं.

गैरसमज - चीन आणि इतर देश जिथे कोरोनाच्या जास्त केसेस आहेत. तेथील वस्तूंच्या वापराने कोरोना पसरतो.

तथ्य - फार अवघड आहे. कारण वेगवेगळ्या स्थितीत आणि तापमानात वेगवेगळ्या ठिकाणांवर ट्रॅव्हल केल्यावर हा व्हायरस जिवंत राहणं फार अवघड मानलं जातं.

गैरसमज - संपूर्ण शरीरावर अल्कोहोल स्प्रे केल्याने कोरोनापासून बचाव होऊ शकतो.

तथ्य - अल्कोहोल स्प्रे तुमच्या शरीरात आधीच गेलेला व्हायरस नष्ट होणार नाही. अल्कोहोल तोंड, डोळे नाकासाठी नुकसानकारक ठरू शकतो. त्यामुळे अल्कोहोल संपूर्ण शरीरावर स्प्रे करण्याऐवजी हॅंट सॅनिटायजरचा वापर करा. जेणेकरून इन्फेक्शनपासून बचाव होऊ शकेल.

गैरसमज - पाळीव प्राण्यांपासून कोरोना पसरतो

तथ्य - अजूनतरी असा कोणताही पुरावा सापडलेला नाही की, पाळवी कुत्र्यांपासून किंवा मांजरींपासून कोरोना व्हायरस पसरतो. पण तरी सुद्धा पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यावर हात चांगले धुवावे.

गैरसमज - फ्लूची व्हॅक्सीन कोरोनापासून बचाव करते

तथ्य - निमोनिया किंवा इन्फ्लूएंजा टाइप बी ची व्हॅक्सीन कोरोनापासून बचाव करू शकत नाही. यासाठी वेगळ्या व्हॅक्सीनची गरज आहे. कोरोनावर अजून व्हॅक्सीनचा शोध लावला गेलेला नाही. त्यामुळे गरजेचं आहे की, या इन्फेक्शनपासून बचाव केला जावा आणि तो रोखला जावा.

गैरसमज - इम्यूनिटी वाढवणाऱ्या औषधांनी कोरोनापासून बचाव होईल.

तथ्य - इम्यूनिटी वाढणाऱ्या कोणत्याही औषधाने कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो असा कोणताही ठोस पुरावा नाहीये. त्यामुळे असा काही गैरसमज ठेवून नये

गैरसमज - प्रत्येकाने N95 मास्क वापरायला हवा

तथ्य - जे लोक कोरोना व्हायरसने पीडित लोकांच्या आजूबाजूला काम करतात त्यांनीच N95 मास्क वापरण्याची गरज आहे. ज्यांच्यात कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत त्यांनी मास्क वापरू नये. पण तरी व्हायरसपासून बचावासाठी मास्क वापरत असाल तर फायदा आहेच.

गैरसमज - अ‍ॅंटी-बायोटिक औषधांनी कोरोनापासून होतो बचाव

तथ्य - अ‍ॅंटी-बायोटिक औषधे बॅक्टेरिया विरोधात काम करतात व्हायरस विरोधात नाही. कोरोना हा एक व्हायरस आहे. अ‍ॅंटी-बायोटिकचा कोरोना व्हायरसवर काहीही प्रभाव होत नाही.

गैरसमज - चिकन, मासे, मांस खाल्ल्याने कोरोनाचा धोका वाढतो

तथ्य - हा व्हायरस याने संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावरच वाढतो. मांस, चिकन खाऊन हा व्हायरस पसरत असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. 


Web Title: Coronavirus: 10 misconceptions about coronavirus you must not believe api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.