भारतात कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी 'या' ६ औषधांचा होतोय वापर; जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 10:02 AM2020-07-15T10:02:12+5:302020-07-15T10:03:45+5:30
CoronaVirus Latest Updates & News : भारतात अनेक कंपन्यांनी कोरोनाचे औषध लॉन्च केले आहे. त्यासाठी या कंपन्यांना DCGA कडून परवागनी मिळाली आहे.
(image credit- healthline)
जोपर्यंत कोविड १९ ची लस येत नाही तोपर्यंत गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत कोरोना व्हायरसची लस येत नाही तोपर्यंत कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणणं कठीण आहे. सामान्य लक्षणं दिसत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत. भारतात अनेक कंपन्यांनी कोरोनाचे औषध लॉन्च केले आहे. त्यासाठी या कंपन्यांना DCGA कडून परवागनी मिळाली आहे.
Glenmark Pharmaceuticals कंपनीने कोरोनाच्या उपचारात वापरात असलेली फेबीफ्लू या औषधांच्या किमतीत २७ टक्क्यांनी कमी केली आहे. आधी या टॅबलेटची किंमत १०३ रुपये इतकी होती. त्यानंतर किंमत कमी करून ७५ रुपये ठेवण्यात आली. माइल्ड ऐंड मॉडरेट कोरोना रुग्णांवर या औषधाचा वापर केला जात आहे.
गेल्या काही दिवसात बायोकॉनचे औषध Itolizumab ला कोरोनाच्या उपचारांसाठी परवागनी मिळाली आहे. याचा वापर मॉडरेट टू सीवियर कोरोना रुग्णांवर केला जातो. या इंजेक्शनच्या कोर्सची किंमत ३२ हजार रुपये इतकी आहे. तर एका इंजेक्शनची किंमत ८ हजार रुपये इतकी आहे. या औषधांच्या वापराला जगभरातून मंजूरी मिळाली आहे.
जून महिन्यात सीपला कंपनीने रेमडीसीवीरचे जेनेरिक वर्जन सिप्रेमी हे औषध लॉन्च केले. त्यासाठी DCGA कडून मान्यता मिळाली आहे. आपातकालीन स्थितीत या औषधाच्या वापरासाठी परवागनी देण्यात आली आहे. हे एक प्रकारचे इंजेक्शन आहे. या औषधांची प्रती वायल ४००० रुपये इतकी आहे.
कोरोना काळात Tocilizumab या औषधांला जबरदस्त मागणी आहे. मुंबईसारख्या भागात या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. बाजारात या औषधाचा काळाबाजार वाढल्याने या औषधांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
Hetero Pharma ने रेमडेसिवीरचे जेनेरिक औषध लॉन्च केले आहे. या औषधाचे नाव कोविफॉर आहे. या औषधाची किंमत प्रति ५,४०० रुपये इतकी आहे. रूग्णालयात भरती असलेल्या रुग्णांवर या औषधाचा वापर केला जातो.
Mylan NV ने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार गिलिड सायंजेसने रेमडीसीवरचे जेनेरिक वर्जन लॉन्च करण्यासाठी करार केला आहे. या औषधाच्या वापरासाठी DGCI कडून परवानगी मिळाली आहे. १०० mg/vial ची किंमत ४,८०० इतकी असेल.
खाद्यपदार्थांना विषाणू आणि जंतूंपासून दूर ठेवण्यासाठी WHO ने सांगितल्या 'या' गाईडलाईन्स
देशात कोरोनाबाधितांचा आकडा ९ लाखांवर; पण 'या' ९ गोष्टी दिलासादायक