Coronavirus : चुकूनही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या किती आहे धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 09:48 AM2021-01-01T09:48:27+5:302021-01-01T09:49:57+5:30
जगभरातील वैज्ञानिक आणि चिकित्सक नव्या स्ट्रेनचा स्त्रोत शोधण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. याबाबत अजून बरीच माहिती मिळणं बाकी आहे.
कोरोना व्हायरसची भिती अजून दूर झालेली नाही. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे तर लोकांमध्ये अधिक तणाव वाढत आहे. ब्रिटनमध्ये पसरलेला नवा स्ट्रेन डेनमार्क, नेदरलॅंड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, जपाननंतर आता भारतातही आला आहे. जिथे लोकांना कोविड-१९ वॅक्सीन आल्याने थोडा धीर मिळाला होता, पण आता त्यांचं टेंशन कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे वाढलं आहे. जगभरातील वैज्ञानिक आणि चिकित्सक नव्या स्ट्रेनचा स्त्रोत शोधण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. याबाबत अजून बरीच माहिती मिळणं बाकी आहे.
पण जेव्हा म्यूटेंट व्हेरिएंट म्हणजे नवीन स्ट्रेनच्या लक्षणांचा विषय येतो तेव्हा सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिवेंशनने लोकांना यापासून बचावासाठी लगेच डॉक्टरांना संपर्क करण्याचा आणि याकडे अजिबात दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये नव्या प्रकारचाक कोरोना एक गंभीर धोका निर्माण करू शकतो.
कोविड १९ ची सामान्य लक्षणे
जेव्हा पहिल्यांदा कोरोना व्हायरसची माहिती समोर आली होती तेव्हा याच्या वेगवेगळ्या समोर येणार आहेत. या व्हायरसबाबत वैज्ञानिकांनाही रोज नवीन गोष्टी समजतात. कोरोनाची काही मुख्य लक्षणे तज्ज्ञांनी सांगितली आहेत. त्यात ताप, कोरडा खोकला, घशात खवखव, छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास, थकवा, पोटासंबंधी संक्रमण, चव किंवा गंध न समजणे इत्यादींचा समावेश होतो.
काय आहे नवा कोविड स्ट्रेन?
नव्या कोरोना व्हायरस व्हेरिेएंटला VUI 202012/01 असं नाव देण्यात आलं आहे. नव्या प्रकारचा कोरोना व्हायरसमध्ये स्पाइक प्रोटीन असल्याची बाब समोर आली आहे. तज्ज्ञांनुसार, नव्या कोविड स्ट्रेनमध्ये स्पाइक एक आनुवांशिक परिवर्तन आहे. जो लोकांच्या शरीरात सहजपणे आणि वेगाने पसरत आहे. स्पाइक प्रोटीनच्या मदतीने कोरोना व्हायरस मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतो आणि सेल्स आपल्या ताब्यात घेतो. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये १७ वेगवेगळ्या प्रकारचे म्युटेशन असण्याची बाब समोर आली आहे. या म्युटेशनमध्ये स्पाइक प्रोटीनही आहे जे कोरोना व्हायरस फॅमिलीला त्याचं नाव देतो.
नव्या व्हायरसची लक्षणे
नव्या कोरोना व्हेरिएंटची लक्षणेही ओरिजीनल कोविड १९ च्या समान आहेत. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिवेंशनने कोविड १९ ची नवीन स्ट्रेनची ५ गंभीर लक्षणे सांगितली आहेत. यावर प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज आहे. जर तुम्हालाही ही लक्षणे दिसली तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- श्वास घेण्यास त्रास होणे
- भ्रम झाल्यासारखं वाटणे
- सतत छातीत दुखणे
- थकवा जाणवणे
- चेहरा आणि ओळ निळे पडणे
किती धोकादायक आहे नवा स्ट्रेन
नव्या कोरोना व्हेरिएंटबाबत नुकताच लंडन स्कूल ऑफ हायजीन अॅन्ड ट्रॉपिकल मेडिसीनमध्ये एक रिसर्च करण्यात आला. ज्यात सांगण्यात आलं की, नवा कोविड स्ट्रेन लंडनमधील मृतांचा आकडा वाढवू शकतो. तज्ज्ञांना अशीही भीती आहे की, २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये पसरणाऱ्या म्युटेशनने रूग्णांची संख्या अधिक वाढेल. तसेच तज्ज्ञ म्हणाले की, या नव्या स्ट्रेनचा धोका लहान मुलांना सुद्धा आहे.