आता नेझल स्प्रे ने कोरोनापासून होईल बचाव; ४८ तासात व्हायरस होणार नष्ट, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 12:02 PM2020-11-25T12:02:59+5:302020-11-25T12:04:57+5:30

Coronavirus News & Latest Updates : या माध्यमातून श्वास घेतल्यानंतर नाकातून शरीरात प्रवेश करणारा कोरोना व्हायरस पुढे जाण्यापासून रोखता येऊ शकतो.

CoronaVirus : Anti corona nasal spray to kill virus in few hours and prevent infection | आता नेझल स्प्रे ने कोरोनापासून होईल बचाव; ४८ तासात व्हायरस होणार नष्ट, तज्ज्ञांचा दावा

आता नेझल स्प्रे ने कोरोनापासून होईल बचाव; ४८ तासात व्हायरस होणार नष्ट, तज्ज्ञांचा दावा

googlenewsNext

ब्रिटनच्या बर्मिंघम युनिव्हर्सिटीकडून नेजल स्प्रे तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून श्वास घेतल्यानंतर नाकातून शरीरात प्रवेश करणारा कोरोना व्हायरस पुढे जाण्यापासून रोखता येऊ शकतो. त्यामुळे व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं.  या स्प्रे ने कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी कशी मदत होते. याबाबत जाणून घेऊया. फेसमास्कचा उपयोग करताना अनेकदा श्वास घेण्याच्या त्रासामुळे मास्क नाका- तोंडाच्या खाली येतो. सार्वजनिक ठिकाणी मास्कने नाक, तोंड झाकलं नसेल तर धोका वाढू शकतो. मास्कच्या वापराबाबत निष्काळजीपणा केल्यास महागात पडू शकतं. लवकरच तुमची ही चिंता  दूर होऊ शकते. कारण ब्रिटनच्या बर्मिंघम युनिव्हर्सिटीद्वारे तयार करण्यात आलेला एंटी कोरोना नेझल स्प्रे लवकरच बाजारात उपलब्ध होऊ शकतो.

वैशिष्ट्यै

एंटी कोरोना नेजल स्प्रे तयार केलेल्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा नेझल स्प्रे सुरूवातीला नाकाच्या आतील भागात  हवेचा एक थर तयार करतो. त्यामुळे कोरोना व्हायरस शरीरातील पेशींना चिकटत नाहीत. नाकात असलेला कोरोनाला व्हायरस नेजल स्प्रेच्या साहाय्याने ४८ तासात नष्ट होण्यास मदत होईल. 
 नेजल स्प्रे तयार करण्यासाठी कॅरगीनेन आणि गॅलन सारख्या रसायनांचा वापर करण्यात आला आहे. ही रसायनं शरीरासाठी सुरक्षित मानली जातात.

या रसायनांचा वापर अन्य औषधं आणि फास्ट फूड तयार करण्यासाठी केला जातो. याच आधारावर प्रशासनाकडून  नेजल स्प्रे तयार करण्याची अनुमती मिळाली आहे. नाकात हा स्प्रे मारल्यानंतर जेव्हाही कोरोना व्हायरस श्वासांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करेल तेव्हा स्प्रे चे आवरण चढेल. यामुळे व्हायरस त्वचेवर चिकटू शकणार नाही. याद्वारे शिकल्यानंतर हवेमुळे आलेल्या दबावामुळे व्हायरस शरीरातून बाहेर फेकून दिला जातो. कोणत्याही माध्यमातून व्हायरसने शरीरात प्रवेश केला तरी  शरीरात संक्रमण पसरत नाही. कारण नेजल स्प्रे शरीराला संरक्षण देते. काहीवेळातच व्हायरस नष्ट व्हायला मदत होते.

फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकणार नाही कोरोना व्हायरस

या संशोधनातील प्रमुख तज्ज्ञ सिमोन क्लॉर्क यांनी सांगितले की, साधारणपणे कोरोना व्हायरसचे संक्रमणाची लक्षणं लोकांमध्ये दिसून येतात. तेव्हा व्हायरस व्यक्तिच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचून संक्रमित करतो. या नेझल स्प्रेच्या वापरामुळे कोरोना व्हायरस फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्याआधीच मरून जाईल. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये संक्रमण होण्यापासून वाचवता येऊ शकतं. 

दिलासादायक! भारतात सगळ्यात आधी 'या' १ कोटी लोकांना कोरोनाची लस देणार; लसीकरणाची यादी तयार 

या लोकांसाठी सगळ्यात जास्त प्रभावी ठरेल

बर्मिंघम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार नेजल स्प्रे ज्या लोकांसाठी अधिक परिणामकारक ठरतो. ज्यामुळे संक्रमित  रुग्णांमध्ये राहून काम करणारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ यांना फायदा होऊ शकतो.  नेझल स्प्रेचा वापर केल्यानंतरही गाईड लाईन्सचे पालन करणं गरजेचं आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंग, सतत हात धूत राहणं, सॅनिटाईज करणं या गोष्टी रोजचं करायला हव्यात. जेणेकरून कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो.  भारतात लसीकरणाला सुरूवात होणार?; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं सगळ्यात आधी कोणाला मिळणार लस

Web Title: CoronaVirus : Anti corona nasal spray to kill virus in few hours and prevent infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.