आता कोरोनावरील उपचारासाठी ‘अँटीबॉडी कॉकटेल’ भारतातही उपलब्ध, एका डोसची किंमत 59,750 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 03:22 PM2021-05-24T15:22:24+5:302021-05-24T15:28:19+5:30
हलक्या स्वरुपाची आणि मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी 'रामबाण'
नवी दिल्ली - भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यातच जगातील अग्रगण्य औषध निर्माता कंपनी Roche ने तयार केलेली 'अँटीबॉडी कॉकटेल' आता भारतातही उपलब्ध होईल. Roche एक स्विस कंपनी असून ती भारतात प्रसिद्ध फार्मा कंपनी सिप्लाच्या माध्यमाने हे औषध लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. (CoronaVirus Antibody cocktail used to treat covid 19 is now available in india)
हलक्या स्वरुपाची आणि मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी 'रामबाण' -
या औषधात Casirivimab आणि Imdevimab नावाच्या दोन औषधांचे मिश्रण आहे. ही दोन्ही अँटीबॉडी औषधं व्हायरसवरील उपचारावर चांगल्या प्रकारे प्रभावी आहेत. विशेषतः हलक्या आणि मध्यम स्वरुपाचे संक्रमण असलेल्या रुग्णांसाठी हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. Central Drugs Standards Control Organisation (CDSCO) ने देशातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या औषधाच्या वापराला मंजुरी दिली. तेव्हापासूनच हे औषध भारतीय नागरिकांसाठी लवकरच उपलब्ध होईल, असे कयास लावले जात होते. यूरोप आणि अमेरिकेत या औषधाला आधीच मंजुरी देण्यात आली आहे.
Roche & Cipla announce the arrival of the first batch of the new antibody cocktail drug (#Casirivimab and #Imdevimab) in India – aimed at reducing the risk of hospitalization and helping in early recovery in #Covid19 patients by halting progression. https://t.co/CynBXp6hbOpic.twitter.com/xtLl26RHKw
— Cipla (@Cipla_Global) May 24, 2021
12 वर्षांवरील मुलांनाही दिले जाऊ शकते हे अँटीबॉडी कॉकटेल -
या औषधाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, हे औषध म्हणजे, सर्वसामान्यपणे लॅबमध्ये तयार करण्यात आलेले प्रोटीन आहेत. हे प्रोटीन व्हायरसचा सामना करण्यासाठी इम्यून सिस्टमच्या क्षमतेची कॉपी करतात. यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. महत्वाचे म्हणजे, या औषधाचा वापर 12 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांवरही केला जाऊ शकतो.
या औषधाची किंमत सध्या फार अधिक असेल. प्रत्येक रुग्णासाठी या औषधाच्या डोसची किंमत 59,750 रुपए एवढी असेल. यात सर्व प्रकारच्या करांचा समावेश आहे. हे औषध मुख्य रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्रांच्या माध्यमाने उपलब्ध होईल. सर्वसामान्यांचा विचार करता ही किंमत फार अधिक आहे.