CoronaVirus : ...म्हणून कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी महिला सक्षम; पण पुरूषांना धोका जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 06:58 PM2020-12-22T18:58:52+5:302020-12-22T19:18:20+5:30

CoronaVirus News & Latest Updates : माहामारीतही पुरूषांच्या तुलनेत महिलांना कमी त्रासाचा सामना करावा लागला होता. साथीच्या रोगातही पुरुषांपेक्षा स्त्रिया जिवंत राहण्याची शक्यता जास्त होती.

CoronaVirus : Are women more stronger than men to fight covid-19 | CoronaVirus : ...म्हणून कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी महिला सक्षम; पण पुरूषांना धोका जास्त

CoronaVirus : ...म्हणून कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी महिला सक्षम; पण पुरूषांना धोका जास्त

googlenewsNext

कोरोना व्हायरस हा आजार सगळ्यांनाच प्रभावीत करतो. मागच्या काही महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या अनेक अभ्यासातून दिसून आलं की, कोरोनामुळे कमी प्रमाणत महिला संक्रमित झाल्या आहेत. तुलनेने पुरूषांचे प्रमाण जास्त आहे. यामुळेच मृत्यूदरही कमी आहे. मागच्या माहामारीतही पुरूषांच्या तुलनेत महिलांना कमी प्रमाणात आजारांचा सामना करावा लागला होता. साथीच्या रोगातही पुरुषांपेक्षा स्त्रियांची जिवंत राहण्याची शक्यता जास्त होती. याची पुष्कळ कारणे असू शकतात जी माणसांच्या कमजोरीकडे प्रत्यक्षात लक्ष वेधतात.

महिलांची रोगप्रतिकारकशक्ती जास्त असते

काही वैद्यकीय शास्त्रज्ञांनी केलेल्या नव्या शोधामध्ये कोविड -१९ च्या संक्रमणात  पुरुषांपेक्षा महिलांचे रक्षण करत असलेल्या प्रोटीन्सचे काही तुकडे सापडले आहेत. एसीई 2 रीसेप्टर एक प्रोटीन आहे ज्यात कोविड -१९ ला बांधून ठेवणारा प्रोटीन व्हायरस सापडला आहे. या प्रोटीनमुळे कोविड -१९ ची कमी तीव्रतेची प्रकरणं स्त्रियांमध्ये दिसून येतात. यामागे काही जेनेटिक कारणं असू शकतात. एसीई -2 रिसेप्टर्स हा मानवी एंजाइमचा एक प्रकार आहे, जो स्वत: ला कोरोना व्हायरशी बांधतो आणि नंतर पुन्हा वारंवार रेप्लिकेट करतो.

हे हृदय आणि रक्ताशी संबंधित विशिष्ट प्रकारच्या फुफ्फुसांच्या आजारापासून देखील संरक्षण करते.
स्त्रियांमध्ये गुणसूत्र आणि हार्मोन्सचे वैशिष्ट्यपूर्ण संयोजन असल्यामुळे, महिलांमध्ये एसीई -2 रिसेप्टर्सची संख्या जवळजवळ दुप्पट असू शकते, ज्यामुळे कोविड -१९ विकसित होण्याचा धोका कमी होतो.  

प्रख्यात संशोधकांना आपल्या अभ्यासामध्ये असे आढळले की एसीई -2 ची एक मोठी संख्या आपल्या सिस्टीममधून व्हायरसचे फिल्टरिंग करून आणि शरीरास काही प्रमाणात सुरक्षित ठेवते. त्या तुलनेत काही अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की एसीई -2 रिसेप्टर्स पुरुषांमध्येच कमी आहेत, परंतु कमजोर देखील आहेत. ज्यामुळे संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

आधीपेक्षा जास्त घातक ठरू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन; संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली, तज्ज्ञांचा दावा

बर्‍याच ठिकाणी पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाणात घराबाहेर काम करतात, ज्यामुळे त्यांना प्रदूषणासंबंधित आरोग्याच्या समस्यांचा धोका उद्भवतो.  एका नवीन अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, पुरुष अधिक सामाजिकरित्या एकत्र येतात आणि रोग होण्याचा उच्च धोका असलेल्या गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्त पुरूष जाण्याची शक्यता असते. पुरुष बहुतेक प्रारंभिक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे त्यांना योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळत नाही. स्त्रिया दिलेल्या सावधगिरीच्या माहितीला अधिक गंभीरपणे घेतात जेणेकरून त्या अधिक सुरक्षित राहतील. कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन नेमका आला कुठून? कितपत जीवघेणा ठरणार? तज्ज्ञ सांगतात की...

Web Title: CoronaVirus : Are women more stronger than men to fight covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.