लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसांचं होतंय नुकसान; संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 11:27 AM2020-06-19T11:27:31+5:302020-06-19T11:30:07+5:30

लक्षणं दिसत नसलेल्या ५० टक्के रुग्णांमुळे नुकसान पोहोचण्याचा धोका जास्त असतो.

Coronavirus asymptomatic patients of covid 19 have high risk of lung infection | लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसांचं होतंय नुकसान; संशोधनातून खुलासा

लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसांचं होतंय नुकसान; संशोधनातून खुलासा

Next

कोरोना  व्हायरसमुळे जगभरात अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. तर अनेकांना या जीवघेण्या आजाराची लागण होत आहे. भारतात कोरोनाचं संक्रमण झालेल्यांची संख्या तीन लाखांपेक्षा जास्त आहे. कोरोना व्हायरची लक्षणं सामान्य फ्लू, सर्दी, खोकला यांसारखी आहेत. गंभीर स्थितीत रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत आहे.  कोरोना व्हायरसबाबत जगभरात रिसर्च सुरू आहे. लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांना नुकसान जास्त पोहोचण्याची शक्यता असते. कारण त्यांना आजाराबाबत काहीही कल्पना नसते. जगभरात लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. 

एका संशोधनातून दिसून आले की, ४५ टक्के लोकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाहीत. सर्दी, खोकला, ताप ही व्हायरसच्या संक्रमणाची प्रमुख लक्षणं आहेत.  तसंच लक्षणं दिसत नसलेल्या ५० टक्के रुग्णांमुळे नुकसान पोहोचण्याचा धोका जास्त असतो. हे संशोधन तीन हजार लोकांवर करण्यात आलं होतं. हे संशोधन क्रुझवरचे प्रवासी, तुरुंगात बंद असलेल्या लोकांवर हे अध्ययन करण्यात आलं  होतं. लक्षणं दिसत नसलेल्या ५० टक्के लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला होता.

 या संशोधनादरम्यान तज्ज्ञांनी ३ हजारापेक्षा जास्त लोकांचे सिटी स्कॅन केले होते. सीटी स्कॅनमध्ये फुफ्फुसांचे नुकसान झालेले दिसून आले.  ३ हजार रुग्णांमध्ये ९६ टक्के लोक लक्षणं नसलेले दिसून आले. तज्ज्ञांना फुफ्फुसांच्या रंगात बदल दिसून आला. लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये बॅक्टेरिया दिसून आले. बॅक्टेरियांचे प्रमाण वाढल्यामुळे ऑक्सिजनची कमरता भासण्याची समस्या उद्भवत होती.

या संशोधनातून दिसून आले की, कोरोना व्हायरसच लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांच्या माध्यामातून वेगाने पसरत आहे. या अभ्यासातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांच्या माध्यमातून संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. मास्कचा वापर केल्यामुळे कोरोना व्हायरसपासून बचाव करता येऊ शकतो. मास्क वापरल्याने स्वतः आणि इतरांही सुरक्षित ठेवता येऊ शकतं. 

कोरोना रुग्णांचे जीव वाचवणार डेक्झामेथॅसोन; नक्की या औषधांचा कसा होतो परिणाम? जाणून घ्या

CoronaVirus News: 'या' रक्तगटाच्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका कमी

Web Title: Coronavirus asymptomatic patients of covid 19 have high risk of lung infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.