Coronavirus : कोरोना संक्रमित लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांबाबत धक्कादायक स्टडी; रक्तगट A, B आणि RH+ ला सर्वाधिक धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 07:42 PM2021-11-30T19:42:29+5:302021-11-30T19:43:04+5:30
Coronavirus : या स्टडीत हे देखील समोर आले आहे की, रक्तगटांची आणि रोगांची गंभीरता तसेच मृत्यूदरासाठी संवेदनशीलता यांच्यात कोणताही संबंध नाही.
Blood Group Study on COVID-19 : कोरोना संक्रमित लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांबाबत धक्कादायक स्टडी समोर आली आहे. A, B आणि Rh+ रक्तगटाचे लोक कोरोना संसर्गसाठी अतिसंवेदनशील असतात. तर O, AB आणि RH+ रक्तगटाचे लोक कोरोना संसर्गास कमी संवेदनशील असतात, असे या स्टडीतून उघड झाले आहे.
याचबरोबर, या स्टडीत हे देखील समोर आले आहे की, रक्तगटांची आणि रोगांची गंभीरता तसेच मृत्यूदरासाठी संवेदनशीलता यांच्यात कोणताही संबंध नाही. ही स्टडी "फ्रंटियर्स इन सेल्युलर अँड इन्फेक्शन मायक्रोबायोलॉजी" च्या 21 नोव्हेंबरच्या आवृत्तीत प्रकाशित झाली आहे. ही स्टडी राजधानी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलच्या डिपार्टमेंट ऑफ रिसर्च ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन मेडिसनने केली आहे.
गंगाराम हॉस्पिटलच्या डॉ. रश्मी राणा यांनी सांगितले की, सीव्हियर एक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम हा कोरोना व्हायरस 2 चा एक नवीन व्हायरस आहे. रक्तगटाचा कोरोना जोखीम किंवा प्रगतीवर काही परिणाम होतो की नाही, म्हणून या स्टडीत आम्ही A, B, O आणि RH रक्तगटांसह कोरोनाची संवेदनशीलता, याचे निदान आणि बरे होण्यासाठी लागणारा वेळ आणि मृत्यूचे प्रमाण तपासले. ही स्टडी 2,586 कोरोना बाधित रुग्णांवर करण्यात आली. ज्यांना 8 एप्रिल 2020 ते 4 ऑक्टोबर 2020 पर्यंत सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दुसरीकडे, डॉ. विवेक रंजन म्हणाले की, B + पुरुष रुग्णांना महिला रुग्णांपेक्षा कोरोनाची शक्यता जास्त असते. रक्तगट B आणि AB ला 60 वर्षे वयाच्या रुग्णांमध्ये संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्याचे आढळून आले. तसेच, आमच्या स्टडी असेही आढळून आले आहे की, रक्तगट A आणि RH+ च्या रुग्णांमध्ये बरे होण्याचा कालावधी कमी आढळला होता, तर O आणि RH- रक्तगटाच्या रुग्णांमध्ये बरे होण्याचा कालावधी वाढला होता, असे डॉ. विवेक रंजन यांनी सांगितले.