CoronaVirus: कोरोनाची लस घेतलेले लोक आताही व्हाय़रस पसरवू शकतात? संशोधन काय सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 03:39 PM2021-05-30T15:39:51+5:302021-05-30T15:40:09+5:30

can Corona Vaccinated people spread Corona Virus: पोलिओची लस. ही लस पोलिओला मेंदू आणि पाठीच्या कण्याला संक्रमित करू शकत नाही. तशीच कोरोना लसीपासून अपेक्षा आहे. संशोधक यावर अभ्यास करत आहेत. ही कोरोना लस लाभार्थ्याला कोरोना संक्रमणापासून वाचवेलच परंतू त्याच्यापासून दुसऱ्याला कोरोना होईल का याचा अभ्यास केला जात आहे.

CoronaVirus: Can corona vaccinated people still spread the coronavirus? research says | CoronaVirus: कोरोनाची लस घेतलेले लोक आताही व्हाय़रस पसरवू शकतात? संशोधन काय सांगते...

CoronaVirus: कोरोनाची लस घेतलेले लोक आताही व्हाय़रस पसरवू शकतात? संशोधन काय सांगते...

Next

Corona Vaccination: अमेरिका इस्त्रायलमध्ये लसीकरण (Vaccination) पूर्ण झालले लोक बिनामास्क फिरु शकत आहेत. अमेरिकेने जेव्हा पहिल्यांदा याचा आदेश काढला तेव्हा तेच थो़डे संभ्रमात होते. कोरोना लसीकरण (Corona Vaccine) झालेला व्यक्ती बाहेर, गर्दीमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात बिना मास्क घालून गेला तर त्याला कोरोनाचा धोका असेल किंवा त्याला कोरोना (Corona Positive) झाला तर तो इतरांना त्याचे संक्रमण करेल याची भीती त्यांना वाटत होती. अखेर पुन्हा काही दिवसांनी त्यांनी लोकांना बिनामास्क (Without mask) फिरण्याची परवानगी दिली. (Can people vaccinated against COVID-19 still spread the coronavirus?)


आता हे लोक बिना मास्क फिरु लागल्याने ज्या लोकांना लस मिळालेली नाहीय ते लोक चिंतेत आहेत. कारण त्यांना या लसीकरण झालेल्या परंतू कोरोना झालेला असेल तर त्यांच्यापासून लागण होण्याची चिंता सतावू लागली आहे. कोरोना लस बनविल्यानंतर संशोधकांनी या लसीपासून 50 टक्के लोक कोरोनाबाधित होणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त केली होती. कोरोनाच्या लसी त्याहूनही चांगल्या असल्याचे दिसून आले. फायझर बायोटेकची एमआरएनए लस 95.3 टक्के प्रभावी आहे. लस बनविणाऱ्यांनी ही लस रोगाणुपरहित प्रतिरक्षा देखील देतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. याचा अर्थ लस घेतलेला व्यक्ती कधीही विषाणूच्या संपर्कात आला तर त्याच्यापासून पुढे हा विषाणू संक्रमित होणार नाही. 


उदा. पोलिओची लस. ही लस पोलिओला मेंदू आणि पाठीच्या कण्याला संक्रमित करू शकत नाही. तशीच कोरोना लसीपासून अपेक्षा आहे. संशोधक यावर अभ्यास करत आहेत. ही कोरोना लस लाभार्थ्याला कोरोना संक्रमणापासून वाचवेलच परंतू त्याच्यापासून दुसऱ्याला कोरोना होईल का याचा अभ्यास केला जात आहे. कोरोना एक मोठे आव्हान देत आहे, कारण कोणतेही लक्षण नसलेले लोकही कोरोना पसरवू शकतात. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना झाला की नाही हे ओळखणे देखील कठीण होऊन बसले आहे. 


एका अभ्यासामध्ये अमेरिकेच्या सीडीसीने आठ ठिकाणी तीन महिने साप्ताहिक आधारावर स्वयंसेवी, आरोग्य आणि फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची तपासणी केली. दोन्ही लसी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्या तुलनेत कोरोना होण्याची शक्यता 25 टक्क्यांनी कमी होती. यामुळे कोरोनाच्या लसी घेतलेले लोक कोरोना होण्यापासून मोठ्या प्रमाणात सुरक्षित असतात आणि ते व्हायरस पसरविण्याची शक्यताही कमी असते असे दिसून आले आहे. ज्या लोकांनी एक डोस घेतला आहे, त्यांना कोरोना झाला तर ज्या लोकांनी लस घेतलेली नाही त्यांच्या तुलनेत कमी कोरोना संक्रमण दिसून आले आहे. 


मॉडर्नाची लस तोंडात किंवा नाकातील द्रव्यामध्ये कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अँटीबॉडी तयार करू शकते. या अँटीबॉडी शरीरात व्हायरस घुसण्यास रोखू शकतात. याचाच अर्थ लस घेतलेला व्यक्ती श्वास घेताना आणि नाक गळत असताना जे थेंब पडतात त्यातून व्हायरस फैलावू शकत नाहीत असे एका अभ्यासात दिसून आले आहे. 
 

Web Title: CoronaVirus: Can corona vaccinated people still spread the coronavirus? research says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.