चिंता वाढली? केवळ गळा आणि नाक नाही तर कानातही पोहोचू शकतं Coronavirus Infection, रिसर्चमधून दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 10:20 AM2020-07-24T10:20:43+5:302020-07-24T10:33:44+5:30
जॉन हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिनच्या टीमचं मत आहे की या रिसर्चनंतर कोरोना व्हायरस लक्षणे असलेल्या व्यक्तींचे कानही चेक केले जावे.
कोरोना व्हायरस नाक, घसा आणि फुप्फुसांना इन्फेक्ट करतो. ही बाब तर सर्वांनाच माहीत आहे. पण सतत होणाऱ्या वेगवेगळ्या रिसर्चमधून कोरोनाबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. आता एका रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरस कानालाही इन्फेक्ट करू शकतो आणि कानाच्या मागच्या हाडालाही. तीन रूग्णांवर करण्यात आलेल्या रिसर्चमधून या दोन भागांवर फार जास्त इन्फेक्सन आढळून आलं. जॉन हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिनच्या टीमचं मत आहे की या रिसर्चनंतर कोरोना व्हायरस लक्षणे असलेल्या व्यक्तींचे कानही चेक केले जावे.
मेडिकल जर्नल JAMA Otolaryngology मध्ये प्रकाशित रिपोर्टमध्ये अशा तीन रूग्णांचा उल्लेख केला आहे. ज्यांचा कोरोना इन्फेक्शनने मृत्यू झाला. यातील दोन रूग्णांचं वय ६० तर एकाचं वय ८० वर्षे होतं. दोन रूग्णांच्या कान आणि कानाच्या मागे mastoid मध्ये इन्फेक्शन आढळून आलं. टीमने सांगितले की, आता याबाबत सतर्कता बाळगावी लागेल.
याआधीही एप्रिलमध्ये एका रिसर्चमधून दावा करण्यात आला होता की, कोरोनामुळे कानाच्या पडद्यामागे इन्फेक्शन होतं. आणखी एका रिसर्चमधून समोर आलं होतं की, ज्या लोकांमध्ये व्हायरसची लक्षणे नव्हती. इन्फेक्शन दूर झाल्यावर त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता.
दरम्यान, कोरोना व्हायरस इन्फेक्शन आतापर्यंत जगभरात १ कोटी ५६ लाखांपेक्षा अधिक लोकांना झालंय. तर ६ लाख ३६ हजार ४७५ लोकांचा मृत्यू झालाय. तसेच ९५ लाख ३५ हजार ६१६ लोक यातून बरेही झाले आहेत.
आता जगभरात या व्हायरसतं इन्फेक्शन इतकं वाढलं आहे की, यावरील वॅक्सीनची गरज निर्माण झाली आहे. काही कंपन्यांनी आणि देशांनी वॅक्सीन तयार केल्याचा दावाही केला आहे. यात ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीची वॅक्सीन पुढे आहे. या वॅक्सीनचे अनेक सकारात्मक रिपोर्ट समोर आले आहेत.
हे पण वाचा :
व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण
भय इथले संपत नाही! देशात कोरोनापेक्षाही घातक आजाराचा शिरकाव; 'या' शहरात आढळला रुग्ण