Coronavirus can treat leprosy drug : दिलासादायक! कुष्ठरोगाच्या औषधानं करता येणार कोरोना संक्रमितांचे उपचार? संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 12:39 PM2021-03-18T12:39:59+5:302021-03-18T13:05:43+5:30

Coronavirus can treat leprosy drug : क्लोफागामाइन औषध एफडीएने मंजूर केले आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या आवश्यक औषधांच्या यादीमध्ये त्याचा समावेश आहे.

Coronavirus can treat leprosy drug may treat infection know research | Coronavirus can treat leprosy drug : दिलासादायक! कुष्ठरोगाच्या औषधानं करता येणार कोरोना संक्रमितांचे उपचार? संशोधनातून खुलासा

Coronavirus can treat leprosy drug : दिलासादायक! कुष्ठरोगाच्या औषधानं करता येणार कोरोना संक्रमितांचे उपचार? संशोधनातून खुलासा

Next

कोरोना व्हायरसच्या आजारानं कोरोडो लोकांना प्रभावित केलं आहे. कोरोनाची लस आल्यानंतर लसीकरणाचं काम सुरू आहे. पण योग्य औषध न मिळाल्यामुळे वैज्ञानिकांचे अजूनही प्रयत्न सुरु आहेत. म्हणूनच अँटी-व्हायरल ड्रग रेमडेसिविर, आर्थराइटिस ड्रग टोसिलिझुमब, अँटी-मलेरियल ड्रग हायड्रोक्लोरोक्वीन कोविड -१९ या रूग्णांच्या उपचारांमध्ये समाविष्ट केले गेले आहे. आता आणखी एक औषध कोरोना विषाणूच्या मध्यम ते गंभीर संसर्गावर उपचार करण्यास देखील मदत करू शकते.

कुष्ठरोगाच्या औषधानं होणार कोरोना संक्रमितांचे उपचार?

ताज्या संशोधनानुसार, कुष्ठरोगात वापरल्या जाणार्‍या औषधामुळे कोविड -१९ विरूद्ध लढायला मदत होऊ शकते. कुष्ठ रोग हा एक संसर्गजन्य रोग आहे ज्यामुळे त्वचेचे गंभीर नुकसान होते. या आजारपणामुळे शरीरावर पांढर्‍या रंगाचे डाग पडतात. प्रभावित क्षेत्रावर डाग असलेल्या भागावर पीडित व्यक्तीस संवेदना जाणवत नाही. शरीराच्या कोणत्याही भागावर डाग येऊ शकतात आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे ते शरीरा इतर ठिकाणीही पसरतात.

दिवसाला फक्त १ केळी खाल्यानं वजन कमी होण्यासह मिळतात हे फायदे; या प्रकारचं केळं सगळ्यात जास्त गुणकारी

प्रयोगासाठी शास्त्रज्ञांनी कोरोना संक्रमित उंदीरांसारख्या प्राण्यांवर क्लोफेगामाइनची चाचणी केली. नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की कुष्ठरोगाच्या औषधाने कोरोना व्हायरसविरूद्ध तीव्र अँटी-व्हायरल क्रिया दर्शविली जात आहे, ज्यामुळे कोविड -१९ शी संबंधित गंभीर त्रास होण्यास प्रतिबंध करण्यास मदत झाली. निकालांच्या आधारे मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल असे सांगितले जात आहे.

अमेरिकेतील सॅनफोर्ड बर्नहॅम प्रीबिसचे संशोधक सुमित चंदा म्हणाले, "क्लोफाफाझीमिन कोविड -१९ चे एक आदर्श पर्याय आहे.  सुरक्षित, परवडणारी एक गोळी म्हणून वापरले जाते आणि जागतिक स्तरवर उपलब्ध केले जाऊ शकते." आम्हाला आशा आहे की मानवी चाचण्यांच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल न झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह लोकांवर परिणाम पाहण्यासाठी क्लोफाफॅमीनचा उपयोग केला जाईल."

सध्या कोरोना पॉझिटिव्ह लोकांवर  क्लोफागालामाइन या  औषधांचा वापर केल्याने आजाराचा  प्रभाव कमी होऊ शकतो, जो विशेषतः आता महत्वाचा आहे.  कारण आपल्याकडे व्हायरसचे नवीन रूप समोर येत आहेत आणि ज्याच्या विरूद्ध लस कमी प्रभावी दिसते आहे. शास्त्रज्ञांना असे आढळले की क्लोफाफॅझिमिनने हे प्रमाण कमी केले. संसर्ग होण्यापूर्वी निरोगी प्राण्यांना औषध देण्यानं फुफ्फुसांचे नुकसान कमी होते आणि सायटोकाईनच्या प्रसारास प्रतिबंध करते.

कोणत्याही त्रासासाठी गोळ्या घेताना करू नका ही चूक; डॉक्टरांनी सांगितली शरीरासाठी घातक ठरणारी सवय

हाँगकाँग युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर रेन सन म्हणतात की, "क्लोफाफागामाइन देण्यात आलेल्या प्राण्यांच्या आरोग्याचे कमी प्रमाणात नुकसान झाले आणि विषाणूच्या प्रसाराचे प्रमाण कमी झाले.  विशेषत: संसर्ग होण्यापूर्वी हे औषध दिले गेले होते."  क्लोफागामाइन औषध एफडीएने मंजूर केले आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या आवश्यक औषधांच्या यादीमध्ये त्याचा समावेश आहे. १९५४ मध्ये कुष्ठरोगाच्या उपचारांसाठी क्लोफाफॅझिमिनचा शोध लागला होता.

Web Title: Coronavirus can treat leprosy drug may treat infection know research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.