भय इथले संपत नाही! भारतात लहान मुलांमध्ये दिसलं कोरोनाचं घातक रुप, 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 04:06 PM2020-09-08T16:06:12+5:302020-09-08T17:00:23+5:30

या जीवघेण्या सिंड्रोमचे नाव मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम (MIS-C) आहे. भारतातही आता लहान मुलांमध्ये ही लक्षणं दिसायला सुरूवात झाली आहे. 

Coronavirus cases of fatal syndrome reported in children | भय इथले संपत नाही! भारतात लहान मुलांमध्ये दिसलं कोरोनाचं घातक रुप, 'ही' आहेत लक्षणं

भय इथले संपत नाही! भारतात लहान मुलांमध्ये दिसलं कोरोनाचं घातक रुप, 'ही' आहेत लक्षणं

Next

कोरोना व्हायरसचे आतापर्यंत अनेक अहवाल समोर आले आहेत. यात लहान मुलांमध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं लहान मुलांमध्ये दिसत आहेत. इटली, स्पेन, ब्रिटेन आणि अमेरिकेत काही मुलांमध्ये कोरोनाशी संबंधित नवीन सिंड्रोम दिसून आला आहे. या जीवघेण्या सिंड्रोमचे नाव मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम (MIS-C) आहे. भारतातही आता लहान मुलांमध्ये ही लक्षणं दिसायला सुरूवात झाली आहे. 

अन्य देशांच्या तुलनेत भारतात मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम (MIS-C) कमी प्रमाणात पसरला आहे. दिल्लीमधील एम्स रुग्णालयात या आजाराच्या रुग्णांवर अभ्यास करण्यात आला होता. या आजारानेबाधित असलेल्या लहान मुलांना ताप, नाक  गळणं, हृदयाची समस्या अशी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं होती.  दीड वर्षाच्या मुलाला ताप, सर्दी अशी लक्षणं दिसून आली तर सहा वर्षाच्या मुलामध्ये ताप, शरीरावर दाणे येणं, कफ होणं अशी लक्षणं दिसून आली होती.

अलग-अलग होते हैं लक्षण

मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम हा आजार झाल्यास लहान मुलांमध्ये ताप, अंगावर दाणे येणं, अवयवांना सुज येणं अशी लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं काही महिन्यांपूर्वी पसरलेल्या कावासाकी या आजाराशी मिळतीजुळती आहेत. दरम्यान जर्नल सेलमध्ये छापण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार MIS-C आणि कावासाकी या आजारात धमन्यांना होणारं नुकसान आणि लक्षणंही वेगवेगळी आहेत. अभ्यासानुसार कावासाकी आणि MIS-C या आजारात  ताप, कंजक्टीवायटीस, पायांमध्ये आणि घश्यात सुज येणं, रॅशेज येणं अशी लक्षणं दिसून येतात.

केवळ MIS-C हा आजार उद्भवल्यास डोकेदुखी,  पोटदुखी, कफ, सर्दी, खोकला, घसा खवखवणं अशी लक्षणं दिसून येतात.  लहान मुलं आणि मोठ्यांच्या रोगप्रतिकारकशक्तीतं फरक असतो.  शरीरात व्हायरसचा प्रवेश वेगवेगळ्या माध्यमातून होतो. त्यामुळे लहान मुलांमध्ये गंभीर आजारांचा प्रसारही वेगानं होतो. तसंच लसीकरणासाठी त्यांची रोगप्रतिकारकशक्ती  तयार होते. जास्त वयाच्या लोकांना कोरोना व्हायरसचा फटका  बसला आहे. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यामुळे लहान मुलं आणि तरूण या आजारातून बाहेर येण्यात यशस्वी ठरले आहेत. 

कोरोनानंतर आता दुसऱ्या महामारीसाठी सज्ज राहावं; WHO चा जगातील देशांना इशारा

संपूर्ण जग सध्या कोरोना महामारीमुळे ग्रस्त आहे. जगभरातील देशांची अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे की, पुढील महामारीसाठी जगानेही सज्ज राहावं. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडॅनॉम ग्रेबेसियस यांनी सोमवारी सांगितले की, पुढील महामारीसाठी जगाने अधिक चांगले तयार केली पाहिजे.

जगातील देशांना सार्वजनिक आरोग्यात गुंतवणूक करण्याचं आवाहन संघटनेनं केलं आहे. डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात पहिल्यांदा कोरोना विषाणूचा रुग्ण समोर आला होता. त्यानंतर आतापर्यंत जगातील २.७० कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जगभरात या विषाणूमुळे ८,८८,३२६ लोक मरण पावले आहेत. ही महामारी शेवटची नाही, इतिहासाने आपल्याला शिकवलं आहे, उद्रेक आणि साथीचा रोग जीवनाचं कटू वास्तव आहे.

परंतु जेव्हा पुढची महामारी येईल तेव्हा जगाने तयार राहिले पाहिजे. या वेळेपेक्षा जास्त तयारी जगातील सर्व देशांना ठेवावी लागेल असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. याआधी, ऑगस्टच्या सुरूवातीस, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूबद्दल इशारा दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की, कोरोना व्हायरल खूप काळ राहू शकतो. डब्ल्यूएचओने कोविड -१९ च्या सहा महिन्यांच्या मूल्यांकनावर आणीबाणी समितीशी बैठक घेतल्यानंतर हे सांगितले होते.

डब्ल्यूएचओने एका निवेदनात म्हटलं आहे की समितीने कोविड -१९ साथीचा दीर्घकालीन अंदाज वर्तविला आहे. कोरोना विषाणूच्या अस्तित्वाला सात महिने झाले आहेत आणि दरम्यान समितीने कोरोना विषाणूच्या जोखमीचे आकलन करण्यासाठी चार वेळा बैठक घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी कोरोना व्हायरसच्या लसीचे मोठ्या प्रमाणात लसीकरण २०२१ मध्यापर्यंत शक्य नसल्याचा खळबळजनक दावा केला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना WHO च्या या दाव्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

हे पण वाचा-

रोजच्या आहारात भाताचा समावेश करणं ठरू शकतं डायबिटीस, हृदयरोगाचं कारण; वेळीच सावध व्हा

दिलासादायक! कोरोनाच्या लढाईत भारताला रशियाची साथ; पुढच्या महिन्यात लसीच्या चाचणीला सुरूवात

Web Title: Coronavirus cases of fatal syndrome reported in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.