संक्रमणापासून वाचवण्याऱ्या जिन्सला ब्लॉक करत आहे कोरोनाचा विषाणू; 'असे' होत आहेत परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 02:59 PM2020-05-31T14:59:36+5:302020-05-31T15:24:13+5:30
माणसांच्या शरीरात कोरोना अशा जिन्सवर आक्रमण करत आहे जे जिन्स शरीरातील व्हायरसची संख्या वाढण्यापासून रोखत असतात.
कोरोनाचं वाढतं संक्रमण पाहता तज्ज्ञांनी जो दावा केला आहे. त्यामुळे सगळ्यांचीच झोप उडू शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा विषाणू संक्रमण रोखत असलेल्या जिन्सवर आक्रमण करून त्याची क्षमता कमी करत आहे. शरीरातील जिन्स व्हायरसविरुद्ध इम्यून सिस्टीमला अलर्ट करत असतात. पण कोरोनाचा विषाणू याच जिन्सवर आक्रमण करत आहे.
न्यूयॉर्कच्या इकान स्कूल ऑफ मेडिसिनमधील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, माणसांच्या शरीरात कोरोना अशा जिन्सवर आक्रमण करत आहे जे जिन्स शरीरातील व्हायरसची संख्या वाढण्यापासून रोखत असतात. या जीन्सना कमकुवत किंवा नष्ट केल्यामुळे व्हायरस आपली संख्या झपाट्याने वाढवतात . हा शोध माणसांच्या फुफ्फुसांच्या पेशींवर आणि संक्रमित प्राण्यांवर करण्यात आला होता. या शोधानुसार संक्रमणापासून बचाव करत असलेल्या जिन्सचा खूप कमी प्रसिसाद दिसून आला. शरीरातील या खास जिन्सना शास्त्रज्ञ कॉल टू आर्म जिन्स असं म्हणतात.
संशोधकांच्यामते संक्रमित लोकांमध्ये कोरोना व्हायरस फुफ्फुसांपर्यंत पोहोचून आपली संख्या वाढवायला सुरूवात करतो. हे संक्रमण इतक्या वेगाने पसरतं की पेशी या व्हायरसशी लढण्याआधीच व्हायरसचं संक्रमण संपूर्ण शरीरात पसरलेलं असतं. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्तीची व्हायरसशी लढण्याची क्षमता कमी होते. अशाचप्रकारे कॉल टू आर्म जिन्सना व्हायरसने ब्लॉक केल्यामुळे संक्रमण वेगाने पसरतं.
६ हजार औषधांच्या संशोधनानंतर; कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरणार ही २ औषधं, तज्ज्ञांचा दावा
फक्त इन्फेक्शन रोखण्यासाठी नाही; तर कोरोनाला नष्ट करण्याासाठी प्रभावी आहे 'ही' गोष्ट