CoronaVirus : कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी कुत्रे मदत करणार, जाणून घ्या कसे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 05:44 PM2020-04-16T17:44:38+5:302020-04-16T17:51:23+5:30
काही रिसर्चकर्त्यांनी कोरोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी कुत्र्याचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे
कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी औषधं, लस, शोधण्यासाठी वेगवेगळ्या देशात रिसर्च केला जात आहे. कारण कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊन मृत्यू होत असलेल्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या दरम्यान काही रिसर्चकर्त्यांनी कोरोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी कुत्र्याचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. कुत्र्यांचा वापर नेमका कशा पध्दतीने केला जाणार आहे. हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
माणसांच्या तुलनेत कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता १० हजार पटीने जास्त असते. इतकंच नाही तर ड्रग्स आणि स्फोटकं शोधून काढण्यासाठी सुद्धा पोलीस यंत्रणेद्वारे कुत्र्यांचा वापर केला जातो. लंडन स्कूल ऑफ हायजीन आणि ट्रॉपिकल मेडिसीनद्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार कुत्रा श्वासांशी निगडीत आजारांना सहतेने ओळखू शकतो.
मलेरिया सारख्या आजारांना श्वासांद्वारे ओळखण्याची क्षमता कुत्र्यांमध्ये असते. याबाबतीत माहिती मिळाल्यानंतर ब्रिटेनच्या चेरिटेबल संस्थेचे शास्त्रज्ञ मिळून कुत्रा कोरोना व्हायरसचा शोध घेण्यासाठी उपयोगी ठरू शकतो का, याचा शोध घेत आहेत. त्यासाठी कुत्र्यांना खास ट्रेनिंग देण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सरू असल्याचे संशोधक म्हणाले.
लंडन स्कूल ऑफ हायजीन आणि ट्रॉपिकल मेडिसीनच्या रोग नियंत्रण विभागाच्या मते कुत्र्यामध्ये मलेरियाचा रुग्ण ओळखण्याची क्षमता असते. तसंच श्वासांचे इतर आजार सुद्धा कुत्रा शोधून काढण्यासाठी कुत्र्याची मदत होऊ शकते. या कारणांमुळे कुत्रा कोरोना व्हायरसचा तपास करण्यासाठी मदतशीर ठरेल अशी आशा संशोधकांना आहे.
शास्त्रज्ञांच्यामते कुत्र्यांना कॅन्सर आणि पार्किंसंस यांसारख्या आजारांचे सुरूवातीची लक्षणं ओळखण्यासाठी प्रक्षिक्षण दिलं जात आहे. मेडिकल डिटेक्शन डॉग्स स्कूलने कोरोना व्हायरसला हरवण्याासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी कोणत्याही रोगाच्या एका विशिष्ट वासाला सुरक्षित स्वरुपात ओळखून कुत्र्यासमोर द्यायला हवं. असं त्यांचं म्हणणं आहे.