कोरोना व्हायरसमुळे होऊ शकता ताण-तणावाचे शिकार, 'हे' उपाय वापराल तर टेंशन फ्री रहाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 10:13 AM2020-04-16T10:13:07+5:302020-04-16T10:24:43+5:30
कोरोना व्हायरसमुळे मानसिक ताण-तणावाचा सामना करावा लागत आहे. डायबिटीस आणि ब्लडप्रेशरची समस्या असलेल्या लोकांना स्ट्रेस वाढल्यामुळे झोप न येण्याची समस्या जास्त उद्भवत आहे.
कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याआधी अशा प्रसंगाचा सामना अनेकांनी केला नव्हता. कोरोनापासून जास्तीत जास्त लोकांना वाचवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कॅन्सर फॅमिली फाऊंडेशच्या रिसर्चमध्ये असं दिसून आलं की ४५ टक्के अमेरिकन लोकांना कोरोना व्हायरसमुळे मानसिक ताण-तणावाचा सामना करावा लागत आहे. डायबिटीस आणि ब्लडप्रेशरची समस्या असलेल्या लोकांना स्ट्रेस वाढल्यामुळे झोप न येण्याची समस्या जास्त उद्भवत आहे. यासाठी WHO ने काही टिप्स सांगितल्या आहेत. ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ताण- तणावामुळे इम्युनिटी कमी होते. परिणामी अल्जाईमर, स्ट्रोक असे आजार उद्भवण्याची शक्यता असते. अशात मानसिक आरोग्य चांगले नसेल तर रोगांशी सामना करण्याची क्षमता कमी होते. अशावेळी कोरोनाचं संक्रमण झाल्यास शारीरिक स्थिती बिघडू शकते. त्यासाठी ताण-तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोरोना व्हायरसमुळे वाढत असलेला ताण- तणाव कमी करण्यासाठी WHO ने एक काही टिप्स दिल्या आहेत.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे घाबरणं, भीतीचं वातावरण असणं ही सामान्य समस्या आहे. सतत तुमची चिडचिड होत असेल तर स्वतःला शांत ठेवा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीशी, नातेवाईकांशी संपर्क करून गप्पा मारा.
घरी असताना सुद्धा खाण्यापिण्याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. योग्य आणि वेळेवर घेतलेला आहार घ्या, ७ ते ८ तास झोप, दिवसातून एक तास व्यायाम करा. जेणेकरून वजन वाढण्याची समस्या उद्भवणार नाही. तसंच शरीर चांगलं राहील.
कोरोना व्हायरसमुळे निर्माण होणारा स्ट्रेस कमी करण्यासाठी मादक पदार्थांचे सेवन करू नका. धुम्रपान, मद्यमान आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.
कोरोनाच्या लक्षणांना घाबरण्याआधी व्यवस्थित माहिती घेण्याचा प्रयत्न करा. माहिती मिळवत असताना पडताळणी करू शकता.
मोबाईल, टि.व्ही सगळ्यात जास्त वापर या काळात तुमच्या आजारांचं कारण ठरू शकतो. म्हणून कमीत कमी या साधनांचा वापर करा. स्वतःला वेळ द्या, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून कोरोना व्हायरसच्या परिस्थीतीमुळे तणाव येणार नाही.