दिलासादायक! भारतात तयार होणार कोरोनाचं सगळ्यात स्वस्त औषध; जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 02:19 PM2020-07-07T14:19:22+5:302020-07-07T14:28:32+5:30

CoronaVirus news : सोमवारी दिलेल्या माहितीनुसार एंटी व्हायरल औषध रेमडिसिवीरचे जेनेरिक वर्जन भारतात लॉन्च केले जाणार आहे

CoronaVirus : Coronavirus mylan india prices generic version remdesivir | दिलासादायक! भारतात तयार होणार कोरोनाचं सगळ्यात स्वस्त औषध; जाणून घ्या किंमत

दिलासादायक! भारतात तयार होणार कोरोनाचं सगळ्यात स्वस्त औषध; जाणून घ्या किंमत

googlenewsNext

भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या केसेस वाढत आहेत. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने  जगभरात हाहाकार पसरवला आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या औषधांबाबत एक चांगली माहिती समोर येत आहे. औषध तयार करणारी कंपनी Mylan ने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार एंटी व्हायरल औषध रेमडिसिवीरचे जेनेरिक वर्जन भारतात लॉन्च केले जाणार आहे. या औषधांची किंमत ४ हजार ८०० रुपये असेल. विकसित देशांच्या तुलनेत भारतात या औषधाची किंमत ८० टक्के कमी आहे. 

कॅलिर्फोर्नियामधील गिलियड कंपनी आणि  १२७ देशांमध्ये रेमडेसिवीर हे औषध उपलब्ध करण्यासाठी जेनेरिक औषध उत्पादकांनी लायसेनिंगवर हस्ताक्षर केले आहेत. Mylan आधी भारतीय औषध कंपन्यांनी सिप्ला लिमिटेड आणि हेट्रो लॅब्स लिमिटेडने मागच्या महिन्यात जेनेरिक वर्जन लॉन्च केले होते. सिप्ला कंपनीचे सिप्रेम हे औषध ५००० रुपयांना विकले जाण्याची शक्यता आहे.  

कोरोना: भारत में सस्ते में बनेगी रेमडेसिविर, बस इतनी होगी कीमत

रेमडेसिवीरने आपल्या जेनेरिक वर्जन कोविफोरची किंमत ५ हजार ४०० इतकी ठेवली आहे. गिलियडने विकसित देशांसाठी रेमडेसिवीरची किंमत २ हजार ३४० डॉलर इतकी किंमत ठेवलेली आहे.  तीन महिन्यांनंतर हे औषध अमेरिकेसाठी उपलब्ध होईल. Mylan  कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या औषधाचे प्रति १०० mg हे प्रमाण ठरलं होतं. पण कोरोना व्हायरसच्या ट्रिटमेंटसाठी हा कोर्स पूर्ण करण्याची गरज भासेल. असं स्पष्ट करण्यात आलेलं नाही. गिलियड सायंसेसनी दिलेल्या माहितीनुसार पाच दिवसांच्या ट्रिटमेंटसाठी या औषधांचा वापर करता येऊ शकतो. 

रुग्णांवर या औषधांचा वापर केल्याने रिकव्हरी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.  त्यामुळेच या औषधाची मागणी वाढली आहे. Mylan यांनी सांगितले की रेमडेसिवीर हे औषध इंजेक्टेबल साहित्याच्या साहाय्याने तयार केलं जाणार आहे. याव्यतिरिक्त निम्न आणि मध्यम लोकसंख्या असलेल्या १२७  देशांमध्ये कोरोना व्हायरसचं औषध  पोहोचवण्यााठी गिलियड सायंजेसकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने Mylan रेमडेसिवीरचे वर्जन असलेल्या या औषधाला डेसरेम हे नाव दिले आहे. ज्यामुळे कोव्हिड 19 च्या गंभीर रुग्णांवर उपचार केले जात आहेत.  कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी रेमडेसिवीर हे औषध आता परिणामकारक समजलं जात आहे. 

युद्ध जिंकणार! भारतात कोरोनाची पहिली लस तयार होणार; जाणून घ्या 'या' १० महत्वाच्या गोष्टी

Coronavirus News: ठाणे आयुक्तालयात महिला अधिकाऱ्यासह आणखी दहा पोलीस कोरोनामुळे बाधित

Web Title: CoronaVirus : Coronavirus mylan india prices generic version remdesivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.