कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन नेमका आला कुठून? कितपत जीवघेणा ठरणार? तज्ज्ञ सांगतात की...

By Manali.bagul | Published: December 22, 2020 12:10 PM2020-12-22T12:10:51+5:302020-12-22T12:18:54+5:30

CoronaVirus News & Latest Updates : ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा नवीन स्ट्रेन ७० टक्के अधिक संक्रामक असू शकतो. सध्या या व्हायरसची संक्रामकता दिसायला सुरूवात झाली आहे.

CoronaVirus : Coronavirus new variant in britain covid-19 mutation | कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन नेमका आला कुठून? कितपत जीवघेणा ठरणार? तज्ज्ञ सांगतात की...

कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन नेमका आला कुठून? कितपत जीवघेणा ठरणार? तज्ज्ञ सांगतात की...

googlenewsNext

कोरोना व्हायरस जसा चीनमधून संपूर्ण जगभरात पसरला त्याचप्रमाणे नवीन स्ट्रेन हा ब्रिटनमधून पसरायला सुरूवात झाली आहे. हा नवीन स्ट्रेन नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि इटलीमध्ये पसरला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या देशात नवीन कोरोना व्हायरसचा स्ट्रेन आढळून आला आहे. ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा नवीन स्ट्रेन ७० टक्के अधिक संक्रामक असू शकतो. सध्या या व्हायरसची संक्रामकता दिसायला सुरूवात झाली आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकाराबाबत तसंच म्यटेशनबाबत विस्तारानं माहिती देणार आहोत. 

व्हायरसमध्ये परिवर्तन होऊ शकतं का? 

लिव्हरपूल युनिव्हर्सिटीतील इन्फेक्शन एंड ग्लोबल हेल्थचे चेअरमन प्राध्यापक जुलियन हिसकॉक्स यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस प्रत्येक वेळी म्यूटेशन मोडमध्ये असतो.  कोरोना व्हायरससच्या नव्या रूपानेआता कहर केला, यात काहीही नवीन नाही. दरम्यान कोरोनाच्या नवीन स्ट्रेनच्या प्रसाराबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

प्रतीकात्मक तस्वीर

जगभरात सगळ्यात जास्त दिसून येतो कोरोनाचा  D614G प्रकार 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये जेव्हा कोरोना व्हायरस दिसून आला होता. त्यानंतर कोरोनाची अनेक रूपं दिसून आली होती. व्हायरसचा सगळ्यात सामान्य प्रकार D614G हा आहे. फेब्रुवारी महिन्यात युरोपात हा व्हायरस दिसून आला होता.  सध्या जगभरात पसरत असलेल्या नव्या स्ट्रेनशी हा प्रकार मिळता जुळता आहे. याव्यतिरिक्त कोरोना व्हायरसचा एक नवीन स्ट्रेन युरोपात पसरला होता. त्याचे नाव A222V होते. 

आधीपेक्षा जास्त घातक ठरू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन; संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली, तज्ज्ञांचा दावा

कोरोनाचा नवीन प्रकार कुठून आला

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार ब्रिटनमध्ये दिसून आला. नवीन स्ट्रेन खूप बदललेला आहे. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार  कोणत्याही एका रूग्णाच्या शरीरात जाऊन हा व्हायरस बदलल्याची शक्यता असू शकते. रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने ती व्यक्ती व्हायरसला नष्ट करू शकली नाही आणि व्हायरसने रूप बदललं आहे. 

CoronaVirus News: कोरोनामुक्त झालेल्यांचे दात पडू लागल्यानं चिंतेत वाढ; डॉक्टरांसह सगळेच हैराण

नवीन प्रकारच्या व्हायरस व्हायरसवर लस परिणामकारक ठरणार का?

सध्या वैज्ञानिकांना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनबद्दल अधिक माहिती मिळालेली नाही. असं मानलं जात नाही. असं मानलं जात आहे की, नवीन प्रकारच्या व्हायरसवर लस परिणामकारक ठरेल. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये लोकांनी जी लस दिली जात आहे. त्यामुळे रोगप्रतिराकशक्ती मजबूत होत आहे. अशा स्थितीत व्हायरसने रूप बदलून शरीरावर आक्रमण केलं तरी लसीची क्षमता व्हायरसवर आक्रमण त्याला नष्ट करू शकते. 

Web Title: CoronaVirus : Coronavirus new variant in britain covid-19 mutation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.