रोज सार्वजनिक वाहनांचा वापर करत असाल; तर कोरोनापासून बचावासाठी 'अशी' घ्या काळजी

By manali.bagul | Published: December 17, 2020 01:06 PM2020-12-17T13:06:56+5:302020-12-17T13:14:24+5:30

CoronaVirus News & Latest Updates : सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर केल्यास तज्ज्ञांनी दिलेल्या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. तरंच कोरोनामुळे बचाव केला जाऊ शकतो.

CoronaVirus : Coronavirus precautions while using public transport covid-19 prevention | रोज सार्वजनिक वाहनांचा वापर करत असाल; तर कोरोनापासून बचावासाठी 'अशी' घ्या काळजी

रोज सार्वजनिक वाहनांचा वापर करत असाल; तर कोरोनापासून बचावासाठी 'अशी' घ्या काळजी

Next

(Image Credir- Pixaby)

जगभरात आतापर्यंत ७ कोटी ४५ लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोना संक्रमणाचा सामना कराव लागला आहे. आतापर्यंत १६ लख ५५ हजारांपेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संक्रमितांची संख्या ९९ लाखांपेक्षा जास्त आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात मृत्यूदर कमी आहे. लोकांच्या जीवनात अनलॉकमध्ये बदल घडून येत आहे. सार्वजनिक वाहतुकसेवा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर केल्यास तज्ज्ञांनी दिलेल्या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. तरंच कोरोनामुळे बचाव केला जाऊ शकतो.

मास्कचा वापर

मास्क  कोरोना व्हायरसपासून बचावासाठी एक परिणामकारक उपाय मानला जातो. त्यासाठी जेव्हाही तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा मास्क वापरणं गरजेचं आहे. तज्ज्ञ कापडाचा मास्क अधिक प्रभावी असल्याचे सांगतात. याशिवाय तुम्ही वेळोवेळी आपल्या हातांना सॅनिटाईज करत राहायला हवं. दोन जास्तीचे मास्क नेहमी जवळ असायलाच हवेत.

सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करा

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग पाळणं महत्वाचं आहे. त्यासाठी लोकांनी किमान सहा फूट अंतर पाळले पाहिजे. डोळे, नाक, आणि तोंडाला स्पर्श देखील करु नका आणि लोकांच्या संपर्कात वारंवार येत असलेल्या पृष्ठभागास (जसे की रेलिंग, लिफ्टची बटणे किंवा दाराची हँडल) स्पर्श करू नका.

प्रतीकात्मक तस्वीर

बाहेरचं खाणं टाळा

आपण सार्वजनिक वाहतूक वापरत असल्यास बाहेर खाऊ नका. यासाठी, आपण घरातून टिफीन नेणं उत्तम ठरेल. कारण बाहेरच्या अन्नपदार्थ ताजे असतीलच असं नाही. त्यामुळे आजार पसण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. 

सॅनिटायजेशन

जे लोक सार्वजनिक वाहतुकीची वाहने चालवित आहेत, त्यांच्यासाठी नियमितपणे वाहने स्वच्छ केली जाणे देखील आवश्यक आहे, जेणेकरून त्यामध्ये प्रवास करणा-या लोकांना कोरोनापासून वाचता येईल. प्रत्येकाने या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे, तरच आपण कोरोना रोखू शकतो.

Web Title: CoronaVirus : Coronavirus precautions while using public transport covid-19 prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.