चिंताजनक! महाराष्ट्रातील 'या' 3 शहरात वाढतोय कोरोनाचा धोका; अधिक सावध राहावं लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 06:21 PM2021-02-10T18:21:42+5:302021-02-10T18:29:44+5:30

CoronaVirus News & Latest Updates : विदर्भात (vidarbha) कोरोनाचा धोका सर्वाधिक वाढला आहे.  राज्यातील काही भागात दिलासादायक वातावरण असताना दुसरीकडे मात्र चिंताजनक वातावरण आहे.

CoronaVirus : Coronavirus spike in vidarbha new hotspot of corona | चिंताजनक! महाराष्ट्रातील 'या' 3 शहरात वाढतोय कोरोनाचा धोका; अधिक सावध राहावं लागणार

चिंताजनक! महाराष्ट्रातील 'या' 3 शहरात वाढतोय कोरोनाचा धोका; अधिक सावध राहावं लागणार

Next

कोरोना व्हायरसनं गेल्या  वर्षांपासून कहर केलेला पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे.  मुंबई (mumbai coronavirus), पुण्यात थैमान घालणाऱ्या कोरोनानं (coronavirus) आता आपलं केंद्र बदललं आहे. आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट (corona hotspot) समोर आले आहे. राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीनुसार नंदुरबार, सातारा, अमरावती, नागपूर, नाशिक ही पाच ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. तर विदर्भात (vidarbha) कोरोनाचा धोका सर्वाधिक वाढला आहे. 
राज्यातील काही भागात दिलासादायक वातावरण असताना दुसरीकडे मात्र चिंताजनक वातावरण आहे. अकोला, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.

 4 जानेवारीला राज्यात 48,801 सक्रिय रुग्ण होते तर 3 फेब्रुवारीला 37,516 रुग्ण होते. म्हणजेच महिनाभरात ही संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. पुणे, ठाण्यासह 21 जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचं प्रमाण घटलं आहे. पण इतर 14 जिल्ह्यात हे प्रमाण वाढलं आहे. यात  सांगली, कोल्हापूर, जळगाव, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

अमरावतीत 

अमरावती जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. 1 फेब्रुवारी रोजी हे प्रमाण 22 टक्के होतं तर आता सोमवारी ज्या 419 लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी 235 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे हे प्रमाण 56 टक्क्यांवर गेलं आहे. 

नागपूर

मंगळवारी नागपुरात 379 नवीन रुग्णाची नोंद झाली असून यात 5 रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णाच्या वाढीचा टक्का 2.52 असताना नागपूरमध्ये हा दर 3.08 टक्के आहे. त्यामुळे नागपूरकरांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण असून काल केंद्रीय पथकाने विदर्भाचा आढावा घेतला तेव्हा नागपूरमधील वाढती कोरोनाच्या संख्या आणि उपयोजना यावर चिंता व्यक्त केली. सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होत नाही? मग गॅस, पोटदुखीची चिंता सोडा, या उपायांनी समस्या होईल दूर

दरम्यान कोव्हिड टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''नुकत्याच झालेल्या बैठकीत नमुद करण्यात आलं होतं की, राज्यातील १० ते १४ जिल्ह्यांवर लक्ष द्यावं लागणार आहे.'' यावेळी त्यांनी अमरावती अकोला याबद्दल विशेष चिंता व्यक्त केली आहे. या भागांमध्ये टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि उपचारांच्या पद्धतीतही सुधारणा व्हायला हवी असं त्याचं मत आहे. लसीकरणानंतरही होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; जाणून घ्या कशामुळे होतोय प्रसार

Web Title: CoronaVirus : Coronavirus spike in vidarbha new hotspot of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.