कोरोना विषाणूंपासून बचावासाठी व्हायरल झालं आहे 'हे' औषध; मागणीत झपाट्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 05:03 PM2020-06-12T17:03:56+5:302020-06-12T17:18:00+5:30

सोशल डिस्टेंसिंग आणि रोगप्रतिराकशक्ती वाढवण्यावर भर देण्यास सांगितले आहे.

CoronaVirus : Covid 19 ayush ministry recommends homeopathy for immunity boosting | कोरोना विषाणूंपासून बचावासाठी व्हायरल झालं आहे 'हे' औषध; मागणीत झपाट्याने वाढ

कोरोना विषाणूंपासून बचावासाठी व्हायरल झालं आहे 'हे' औषध; मागणीत झपाट्याने वाढ

Next

कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. जगभरातील प्रत्येकालाच कोरोनापासून बचावासाठी औषध कधी येणार याची घाई झालेली आहे. आतापर्यंत कोणतंही औषध किंवा लस कोरोनाशी लढण्यासाठी तयार झालेली नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोगप्रतिराकशक्ती वाढवून तुम्ही या आजारापासून लांब राहू शकता. म्हणूनच आयुष मंत्रालयाने सोशल डिस्टेंसिंग आणि रोगप्रतिराकशक्ती वाढवण्यावर भर देण्यास सांगितले आहे. दरम्यान कोरोनाच्या उपचारांसाठी होपिओपेथी औषधं किती परिणामकारक ठरू शकतील याबात चर्चा सुरू होत्या. पण आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपेथी औषधाबात सोशल मीडियावर वेगवेगळी माहिती समोर येत होती. 

या औषधामुळे  पचनाशी निगडीत समस्या तसंच डिप्रेशनची समस्या दूर करता येऊ शकते. आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आणि कोरोनाला लांब ठेवण्याासाठी हे औषध परिणामकारक ठरत असल्याचे  सांगितल्यानंतर या औषधाचा खप मोठ्या प्रमाणावर वाढला तसंच दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. या औषधाची विक्री कमी असताना आता अचानक झपाट्याने मागणी वाढली आहे. 

भारतात कोरोनाना हरवण्यासाठी होमिओपॅथीचा वापर केला जात आहे. होमिओपॅथीच्या मदतीने नागरिकांमधील रोगप्रतिकारक क्षमता वाढवितानाच त्यांना आरोग्यदृष्टया सुदृढ केले जात आहे. याद्वारे कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असून, नवे रुग्णही आढळत नसल्याचा दावा केला जात आहे. विशेषत: या औषधांच्या मदतीने कोरोनाबाधितांना बरे केले जात असून, या औषधांचा प्रभावी वापर करत नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी चार -चार  गोळ्या घेण्याचा सल्ला दिला जात आहे. 

CCRH च्या रिपोर्टनुसार या औषधाने कोरोना व्हायरसच्या रुग्णांना वाचवता येऊ शकतं. अद्याप कोरोनावर कोणतेही औषधं तयार झालेलं नाही. त्यामुळे संक्रमणापासून वाचवण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी हे औषध परिणामकारक ठरू शकेल. सर्दी, खोकला, घश्यातील वेदना अशा आजारांना वाढू न येता तीव्रता कमी करण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० प्रभावी आहे.  

शरीर डिटॉक्स करण्याासाठी 'हा' सोपा उपाय वापराल; तर नेहमी आजारांपासून दूर राहाल

कोरोनावर १०० % प्रभावी ठरणार अश्वगंधा आणि गुळवेळ; रामदेव बाबांचा दावा, जाणून घ्या यामागचं कारण

 

Web Title: CoronaVirus : Covid 19 ayush ministry recommends homeopathy for immunity boosting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.