Coronavirus : कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युबाबत रिसर्चमधून धक्कादायक दावा, दुर्लक्ष पडू शकतं महागात....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 09:48 AM2021-05-01T09:48:13+5:302021-05-01T09:50:38+5:30

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, महामारीत मृत्यू होणाऱ्याच्या विषयात निष्कर्ष सांगतो की, व्हायरसने संक्रमित झाल्यावर लगेच होणारे मृत्यू केवळ वरवरची संख्या आहे.

Coronavirus: Covid-19 can kill months after infection says study | Coronavirus : कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युबाबत रिसर्चमधून धक्कादायक दावा, दुर्लक्ष पडू शकतं महागात....

Coronavirus : कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युबाबत रिसर्चमधून धक्कादायक दावा, दुर्लक्ष पडू शकतं महागात....

googlenewsNext

 कोरोनाची लागण झालेले जास्तीत जास्त लोक होम आयसोलेशनमध्ये राहून बरे होत आहेत. काही लोकांना कोरोनाची लक्षणे जास्त काळासाठी राहतात आणि काही लोकांना तर बरे झाल्यावरही कोरोनातून बरे झाल्यावरही मृत्युचा धोका राहतो. हा दावा ब्रिटीश मॅगझिन नेचरमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. त्याशिवाय CDC द्वारा जारी एका दुसऱ्या रिसर्चमध्येही या गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे की, Covid-19 ची हलकी लक्षणे असलेल्या रूग्णांमध्ये काही दिवसांनंतर नवीन लक्षणे आढळून येत आहेत. 

नेचरमध्ये प्रकाशित रिसर्चसाठी वैज्ञानिकांनी डेटाबेसमधून ८७ हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण आणि ५० लाख सामान्य रूग्णांची तपासणी केली. त्यांना आढळलं की, कोरोनाने संक्रमित न होणाऱ्यांच्या तुलनेत Covid-19 च्या रूग्णांमध्ये ६ महिन्यांपर्यंत मृत्युचा धोका ५९ टक्के जास्त होता. (हे पण वााचा : खुशखबर! आता तुम्ही घरबसल्या होणार कोरोनामुक्त; केवळ एका गोळीनं 'पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' शक्य)

रिसर्चच्या निष्कर्षातून समजलं की, ६ महिन्यात दर १ हजारापैकी जवळपास ८ रूग्णांचा मृत्यु जास्त काळ राहणाऱ्या कोरोना लक्षणांमुळे होतो आणि या मृत्यूंना कोरोनाशी जोडून बघितलं जात नाही. वैज्ञानिकांनी सांगितलं की, ६ महिन्यात दर १ हजार रूग्णांपैकी २९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यात रूग्ण ३० पेक्षा अधिक दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल होते.

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, महामारीत मृत्यू होणाऱ्याच्या विषयात निष्कर्ष सांगतो की, व्हायरसने संक्रमित झाल्यावर लगेच होणारे मृत्यू केवळ वरवरची संख्या आहे. रिसर्चनुसार, ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे जास्त काळापर्यंत राहतात, त्यांना श्वास घेण्याच्या समस्येसोबतच इतरही आजार होण्याची शक्यता वाढते. रूग्णांमध्ये पुढे जाऊन स्ट्रोक, नर्वस सिस्टीमचा आजार, डिप्रेशनसारखा मानसिक आजार, डायबिटीस, हृदयरोग, डायरिया, पचनासंबंधी समस्या, किडनी खराब होणे, ब्लड क्लॉट, सांधेदुखी आणि केसगळती यांसारख्या समस्याही बघायला मिळू शकतात. (हे पण वाचा : तरूणांसाठी लस घेणं कितपत सुरक्षित?; लसीकरणानंतर या गोष्टींची काळजी घ्या, तरच होईल बचाव)

वॉशिग्टंन यूनव्हर्सिटी मेडिकल स्कूलचे असिस्टंट प्रोफेसर अल अली म्हणाले की, 'आमच्या रिसर्चमधून समोर आले आहे की, संक्रमणाची माहिती मिळाल्यावर सहा महिन्यांपर्यंत मृत्यु धोका कायम राहतो. इतकंच काय तर कोविड १९ हलक्या केसेसमध्ये मृत्युचा धोका कमी नाही. हा संक्रमणाच्या गंभीरतेसोबत वाढतो. या आजाराचा प्रभाव अनेक वर्ष बघायला मिळतो'.
 

Web Title: Coronavirus: Covid-19 can kill months after infection says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.