Coronavirus : 'या' बदलांसोबत आपलं रूप बदलत आहे कोरोना व्हायरस, घाबरण्याचं कारण आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 10:29 AM2020-07-27T10:29:21+5:302020-07-27T10:30:19+5:30

भौगोलिक आणि जलवायु परिवर्तनासोबत कोरोना व्हायरसमध्येही सतत म्यूटेशन म्हणजेच बदल होत आहेत. आतापर्यंत याच्या केवळ ८ स्ट्रेन्सबाबतच माहिती मिळू शकली आहे.

Coronavirus: covid-19 is changing its form these are the possible reasons | Coronavirus : 'या' बदलांसोबत आपलं रूप बदलत आहे कोरोना व्हायरस, घाबरण्याचं कारण आहे का?

Coronavirus : 'या' बदलांसोबत आपलं रूप बदलत आहे कोरोना व्हायरस, घाबरण्याचं कारण आहे का?

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या माध्यमातून वेगाने पसरणारं संक्रमण ज्याला आपण सगळेच कोविड-१९ रूपात ओळखतो. ते सतत आपलं रूप बदलत आहे. जेव्हा एखाद्या व्हायरसमध्ये सतत असा बदल होतो. तेव्हा हे संक्रमण रोखण्यासाठी वॅक्सीन आणि औषध तयार करणं कठिण होऊन बसतं. कोरोनाच्या आतापर्यंत ८ स्ट्रेन्स तयार झाल्या आहेत. भौगोलिक आणि जलवायु परिवर्तनासोबत कोरोना व्हायरसमध्येही सतत म्यूटेशन म्हणजेच बदल होत आहेत. आतापर्यंत याच्या केवळ ८ स्ट्रेन्सबाबतच माहिती मिळू शकली आहे. कोणत्याही ऑर्गेनिजममध्ये म्यूटेशन होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. 

जर व्हायरसमध्ये होणारे हे बदल त्याच्या लाइफमध्ये सकारात्मक बदल आणत असेल तर त्या व्हायरसची ती स्ट्रेन जिवंत राहते आणि पुढे वाढत राहते. म्हणजे अधिकाधिक संक्रमण पसरवते. पण जर म्यूटेशननंतर स्ट्रेन वातावरणानुसार जिवंत राहू शकली नाही तर ती काही वेळातच नष्ट होते.

कोणत्याही व्हायरसमध्ये म्यूटेशनचा अर्थ असा होत नाही की, व्हायरस अधिक घातक होत आहे. त्यामुळे याच्या म्यूटेशनला घाबरण्याची गरज नसते. पण या म्यूटेशनमुळे सर्वाधिक अडचण अशाप्रकारच्या व्हायरसवर वॅक्सीन तयार करताना होते. कारण प्रत्येक ठिकाणी जलवायु वेगवेगळी असते. त्यानुसार अशातही काम करणारी वॅक्सीन तयार करणे आव्हानात्मक आहे.

नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमधून नवीन माहिती समोर  आली आहे. कोविड १९ व्हायरसला कमजोर करण्याचं काम मनुष्याच्या शरीरातील ज्या सेल्स करतात, मुळात ती एकप्रकारची प्रोटीन निर्मिती असते. ताज्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस मनुष्याच्या शरीरात प्रवेश केल्यावर बराच या प्रोटीननुसार रिअ‍ॅक्शन करतो.

म्हणजे वेगवेगळ्या मनुष्यांच्या शरीरात पोहोचून कोरोना व्हायरस वेगळ्या प्रकारे रिअ‍ॅक्ट करत आहे. या वेगवेगळ्या रिअ‍ॅक्शनचा संबंध त्या प्रोटीनसोबत असतो, जो आपल्या शरीरात यांना मारण्याचं काम करतो. कारण हा व्हायरस त्या प्रोटीनकडूनच दिशा-निर्देश घेतो. म्हणजे प्रोटीन कसं काम करतं, त्यानुसार व्हायरसचं रिअ‍ॅक्शन ठरतं.

हा रिसर्च नुकताच ब्रिटनच्या बॉथ यूनिव्हर्सिटी द्वारे करण्यात आला आणि मॉलिक्यूलर बायोलॉजी अ‍ॅन्ड इव्हॉल्यूशन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला. रिसर्चसंबंधी तज्ज्ञांचं मत आहे की, कोरोनासोबतच त्यांनी असे सहा हजारांपेक्षा अधिक ऑर्गेनिजम्सवर रिसर्च केला ज्यांच्यात म्यूटेशन झालं.

Coronavirus : जास्त वजन असलेल्यांना कोरोनाने मृत्युचा धोका तीन पट अधिक - रिसर्च

'या' कारणामुळे सर्वाधिक पुरूष होत आहेत कोरोना विषाणूंचे शिकार; संशोधनातून खुलासा

Web Title: Coronavirus: covid-19 is changing its form these are the possible reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.