Coronavirus: कोरोनावरील औषधाला DCGI ची मान्यता; १०३ रुपयांच्या 'या' गोळीनं रुग्ण बरे होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:58 PM2020-06-20T16:58:46+5:302020-06-20T17:40:25+5:30

कोरोनावर लस शोधण्यासाठी जगातील वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत, मात्र तोवर उपलब्ध असणाऱ्या काही औषधांच्या मिश्रणातून कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे

Coronavirus: Covid 19 Vaccine Update Glenmark Launches Covid Drug | Coronavirus: कोरोनावरील औषधाला DCGI ची मान्यता; १०३ रुपयांच्या 'या' गोळीनं रुग्ण बरे होणार!

Coronavirus: कोरोनावरील औषधाला DCGI ची मान्यता; १०३ रुपयांच्या 'या' गोळीनं रुग्ण बरे होणार!

googlenewsNext
ठळक मुद्देफैबिफ्लू हे औषध कोविड १९ रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणार आहे.भारतीय औषध महानियंत्रक(डीजीसीआय)ने दिली मार्केटिंगची परवानगीसौम्य लक्षण असणाऱ्या कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी वापरणार

मुंबई - चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाचा आकडा साडेतीन लाखांहून अधिक झाला आहे तर महाराष्ट्रात कोरोना आकडा १ लाख २० हजारांच्या वर पोहचला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारसाठी डोकेदुखी वाढली आहे. अशातच कोरोनावर अद्याप कोणतीही लस तयार झाली नाही.

कोरोनावर लस शोधण्यासाठी जगातील वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत, मात्र तोवर उपलब्ध असणाऱ्या काही औषधांच्या मिश्रणातून कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने कोविड १९ च्या सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांसाठी अँटिव्हायरल औषध फेविपिरावीरला फैबिफ्लू नावाने पुढे आणलं आहे. कंपनीने शनिवारी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

शुक्रवारी कंपनीकडून सांगण्यात आले की, भारतीय औषध महानियंत्रक(डीजीसीआय)ने या औषधाच्या निर्मितीसाठी आणि मार्केटिंगसाठी परवानगी दिली आहे. फैबिफ्लू हे औषध कोविड १९ रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणार आहे. ग्लेमार्क फार्मास्युटिल्सचे चेअरमन ग्लेन सल्दान्हा म्हणाले, ही मान्यता आम्हाला त्यावेळी मिळाली आहे जेव्हा भारतात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या पहिल्यापेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारताची आरोग्य व्यवस्था प्रचंड दबावाखाली आहे. फैबिफ्लू या प्रभावी औषधाच्या उपचारामुळे हा तणाव खूप मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

त्याचसोबत क्लिनिकल चाचणीत फैबिफ्लूने कोरोना व्हायरसच्या सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांवर चांगला परिणाम होत असल्याचा निकाल दिला आहे. हे औषध कोरोनावरील उपचारासाठी चांगला पर्याय आहे. कंपनी सरकार आणि आरोग्य समुदायासोबत एकत्रितपणे काम करणार त्यामुळे देशभरात रुग्णांना हे औषध सहज उपलब्ध होऊ शकेल. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १०३ रुपये प्रति टॅबलेट या किंमतीत बाजारात उपलब्ध होईल असं सल्दान्हा यांनी सांगितले आहे.

कसे घ्यायचे डोस?

पहिल्या दिवशी १८०० एमजीचे दोन डोस घ्यावे लागतील, त्यानंतर १४ दिवस ८०० एमजीचे दोन डोस घ्यावेत. ग्लेनमार्क फार्माने सांगितले आहे की, कोरोनाची सौम्य लक्षण असणारे ज्यांना मधुमेह अथवा ह्दयासंदर्भातील आजार आहे तेदेखील हे औषध घेऊ शकतात असं सांगितले आहे.

 

Web Title: Coronavirus: Covid 19 Vaccine Update Glenmark Launches Covid Drug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.