चिंताजनक! पुढची २० वर्ष कोरोना लसीची गरज भासणार, आदर पुनावालांनी सांगितले कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 03:29 PM2020-10-23T15:29:00+5:302020-10-23T15:31:50+5:30

CoronaVirus News & Latest Upadates : जगभरात पुढच्या २० वर्षापर्यंत कोरोनाचा धोका कायम राहणार असून तोपर्यंत कोरोनाची लसीची गरज भासू शकते. 

CoronaVirus : covid-19 world will need vaccines for 20 years says adar poonawalla | चिंताजनक! पुढची २० वर्ष कोरोना लसीची गरज भासणार, आदर पुनावालांनी सांगितले कारण...

चिंताजनक! पुढची २० वर्ष कोरोना लसीची गरज भासणार, आदर पुनावालांनी सांगितले कारण...

Next

कोरोनाचा प्रसार काही महिन्यात आटोक्यात येईल असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा गैरसमज होऊ शकतो. कारण कोरोना व्हायरसची माहामारी इतक्यात नष्ट होणार नाही असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही देशांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर पुन्हा त्याच वेगाने कोरोनाची दुसरी लाट आली आहे. जगातील सगळ्यात मोठी लस निर्माण करणारी कंपनी सीरम इंडिया इन्स्टीट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनसार जगभरात पुढच्या २० वर्षापर्यंत कोरोनाचा धोका कायम राहणार असून तोपर्यंत कोरोनाची लसीची गरज भासू शकते. 

काय म्हणाले आदर पुनावाला?

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी  BusinessToday.In शी बोलताना सांगितले की, ''एकदा वापर झाल्यानंतर लसीची गरज संपली असं आतापर्यंतच्या इतिहासात दिसून आलेले नाही. फ्लू, निमोनिया, पोलियो, कांजण्या या आजारांवरच्या लसी अनेक वर्षांपासून दिल्या जात आहेत. यातील कोणत्याही आजाराचे लसीकरण बंद करण्यात आलेले नाही. लोकसंख्येतील १०० टक्के लोकांचे जरी लसीकरण करून झाल्यानंतरही कोरोनाच्या लसीची गरज संपणार नाही.''

लसीकरणाने कसा परिणाम होईल

लस हे कोणतेही ठोस तंत्रज्ञान नाही. लसीमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढल्याने आजारापासून वाचण्यास मदत होते. तसंच आजाराचा प्रभाव कमी होतो. जरी १०० टक्के लोकांचे आता लसीकरण करण्यात आले तरी भविष्यात लसीची गरज भासणार आहे. 

पाच प्रकारच्या लसी कंपनीकडून तयार केल्या जाणार

सीरम इन्स्टिट्यूट २०२१-२२ च्या शेवटापर्यंत जगभरासाठी एकूण पाच वेगवेगळ्या लसी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. जवळपास  १ अब्ज डोस तयार केले जाणार आहेत. पुनावाला यांनी सांगितले की आमची योजना प्रत्येक तिमाहीत लस लॉन्च करण्याची आहे. या योजनेची सुरूवात कोविशिल्डपासून होणार आहे. पुढच्या वर्षी ही लस यशस्वीरित्या तयार झालेली असेल. कोरोना काळात तरूणांनाही होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास; निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांनी दिल्या टिप्स

कोविशिल्ड या लसीचा विकास ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील जेनर इन्स्टिट्यूटद्वारे करण्यात आला आहे. या लसीचे लायसेंस एक्स्ट्राजेनेका कंपनीकडून प्राप्त झाले आहे. या लसीची शेवटच्या टप्प्यातील चाचणी भारतातील १६०० लोकांवर होणार आहे. ही लस पुढच्यावर्षी लॉन्च होऊ शकते. जवळपास २ ते ३ कोटी डोस तयार करण्याची सुरूवात झाली आहे. पुढे  लसीचे उत्पादन वाढवून ७ ते ८ कोटी लसी तयार करण्यात येणार आहेत. दिलासादायक! भारतात १०० स्वयंसेवकांवर होणार स्पुटनिक-व्ही लसीची चाचणी, सरकारनं दिली परवानगी

Web Title: CoronaVirus : covid-19 world will need vaccines for 20 years says adar poonawalla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.