CoronaVirus : डायबिटीसच्या रुग्णाने 'असं' हरवलं कोरोनाला, जाणून बचावाचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 11:19 AM2020-04-13T11:19:03+5:302020-04-13T11:21:09+5:30

डायबिटीसच्या रुग्णांनी कोरोनावर कशी मात केली याबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुमच्या मनात कोरोनाविषयी असलेली धास्ती कमी होईल. 

CoronaVirus : Diabetes patients beat coronavirus diabetes and blood pressure patients can fight the virus myb | CoronaVirus : डायबिटीसच्या रुग्णाने 'असं' हरवलं कोरोनाला, जाणून बचावाचे उपाय

CoronaVirus : डायबिटीसच्या रुग्णाने 'असं' हरवलं कोरोनाला, जाणून बचावाचे उपाय

Next

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहे.  कोरोनाच्या  संक्रमणाची भीती हृदय विकाराच्या रुग्णांना, डायबिटीस, बीपी असलेल्या लोकांना जास्त आहे. कारण सध्या कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांमध्ये वयोवृध्द रुग्णांचा समावेश अधिक दिसून येत आहे. आज आम्ही तुम्हाला डायबिटीसच्या रुग्णांनी कोरोनावर कशी मात केली याबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुमच्या मनात कोरोनाविषयी असलेली धास्ती कमी होईल. 

अलिकडेच एका डायबिटीस असलेल्या व्यक्तीला कोरोनाचे संक्रमण झाले होते. हा व्यक्ती जीवघेण्या आजारापासून बरा झाला आहे. कोलकात्यामधील ५१ वर्षीय व्यक्तीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या व्यक्तीचं नाव गोपीकृष्ण अग्रवाल आहे. यांनी असं सांगितलं की उपचारादरम्यान ते खूप सकारात्मक होते. रक्तातातील साखरेची पातळी कमी असेपर्यंत डायबिटीसच्या रुग्णाला चिंता करण्याचे काहीही कारण नाही.  ( हे पण वाचा-Coronavirus : जेवढा विचार केला होता त्यापेक्षा दुप्पाट वेगाने पसरत आहे कोरोना, रिसर्चमधून दावा)

तज्ञांच्यामते डायबिटीसच्या रुग्णांची स्थिती चांगली असेल तर साधारण रुग्णाप्रमाणेच उपचार केले जातात. गोपीकृष्ण यांना आठ दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं.  त्यादरम्यान त्यांना मलेरियाचं औषध दिलं जात होतं. काही दिवसात पुन्हा तपासणी केल्यानंचर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आलं. सकारात्मक राहून आणि आधीच वैयक्तीक पातळीवर स्वतःची काळजी घेऊन, आहाराची पथ्य पाळून आहार नियंत्रणात ठेवून तुम्ही या आजारातून बाहेर पडू शकता. ( हे पण वाचा-दातांच्या पिवळटपणामुळे इंप्रेशन खराब होतंय? घरच्याघरी 'या' उपायांनी मिळवा चमकदार दात)

Web Title: CoronaVirus : Diabetes patients beat coronavirus diabetes and blood pressure patients can fight the virus myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.