CoronaVirus: कोरोनाच्या संक्रमणामुळे उद्भवतोय 'हा' गंभीर आजार; डॉक्टरही चक्रावले 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 11:46 AM2020-10-21T11:46:09+5:302020-10-21T11:55:45+5:30

CoronaVirus News & Latest Updates : रुग्णात नवीन समस्या आढळल्यामुळे जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अमेरिकेतील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफहेल्थमध्ये  याबाबत अधिक संशोधन सुरू आहे. 

Coronavirus: Doctors are now probing whether covid-19 is causing diabetes even with no history of the disease | CoronaVirus: कोरोनाच्या संक्रमणामुळे उद्भवतोय 'हा' गंभीर आजार; डॉक्टरही चक्रावले 

CoronaVirus: कोरोनाच्या संक्रमणामुळे उद्भवतोय 'हा' गंभीर आजार; डॉक्टरही चक्रावले 

Next

जगभरातील कोरोनाच्या संक्रमणात वाढ झालेली दिसून येत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ११ लाखांवर पोहोचली आहे. अनेक रिपोर्ट्मधून दावा केला जात आहे की, आधीपासून कोणत्याही आजाराने पीडीत असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचा सगळ्यात जास्त धोका आहे. विशेष म्हणजे डायबिटीस असलेल्या रुग्णांसाठी कोरोना व्हायरसचा जास्त धोका असू शकतो असं दिसून येत आहे. आता कोरोना आणि डायबिटीसच्या संबंधाबाबत डॉक्टरांनी एक धक्कादायक खुलासा केलेला आहे.

एका रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे लोकांना डायबिटीसची समस्या उद्भवत आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात लंडनचा रहिवासी असलेल्या २८ वर्षीय व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर तपासणी केल्यानंतर टेस्ट पॉझिटिव्ह आली. औषधोपचार  सुरू  केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा घडून आली. ऑगस्ट महिन्यात अचानक थकवा जाणवू लागला. त्यानंतर उलट्या होण्याचा  त्रास झाला.  त्यामुळे पुन्हा रुग्णालयातील भरती करण्यात आलं. त्यानंतर या व्यक्तीला आयसीयूमध्ये ठेवण्याची वेळ आली.

डॉक्टरांनी सांगितले की, वेळेवर या व्यक्तीला रुग्णालयात भरती केलं नसते तर मृत्यू होण्याची शक्यता होती. तपासणीदरम्यान दिसून आलं की, या व्यक्तीला टाईप १ डायबिटीसचा धोका उद्भवला होता. कोरोना संक्रमण होण्याआधी या व्यक्तीला डायबिटीजची समस्या नव्हती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संक्रमणामुळे डायबिटीसचा आजार उद्भवला होता. रुग्णात नवीन समस्या आढळल्यामुळे जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अनेक तज्ज्ञांनी हे मान्य केलं आहे की, रुग्णांना कोरोनाच्या संक्रमणानंतर ही डायबिटीसची समस्या उद्भवते. यावर अजून संशोधन सुरू आहे. अमेरिकेतील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफहेल्थमध्ये  याबाबत अधिक संशोधन सुरू आहे. 

प्रतीकात्मक तस्वीर

काय आहे डायबिटीस टाईप १ ची समस्या

टाईप १ 

टाईम्स ऑफ इंडीयाच्या एका रिपोर्टनुसार टाईप १ डायबिटीज  हा लहान हा आजार लहान मुलांमध्येही आढळतो. या आजारात इन्सुलिनची निर्मिती व्यवस्थित होत नाही. बाहेरून इन्जेक्शन्स घ्यावे लागतात. १५  ते २५ या वयातील मुलांना हा डायबिटीस झाल्याचे आढळून येते.

टाईप २ 

वयोवृद्धांसह तरूणांमध्येही टाइप २ डायबिटीसचा धोका अधिक वाढतो आहे. टाइप २ डायबिटीसने पीडित लोक इन्सुलिन रेजिस्टेंस नावाच्या एका स्थितीने पीडित होतात. म्हणजे त्यांच्या शरीरात इन्सुलिन तर तयार होतं, पण शरीर ग्लूकोजला पेशींमध्ये पोहोचवण्यात याचा योग्यप्रकारे वापर करू शकत नाही. यामुळे रक्तात ग्लूकोजचं प्रमाण वाढतं. याचा परिणाम असा होतो की, याच्याशी लढा देण्यासाठी पेन्क्रियाजला आणखी जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं. या कारणाने पेन्क्रियाजवर जास्त दबाव पडतो. त्यामुळे पेन्क्रियाज ब्लड ग्लूकोजचं प्रमाण सामान्य ठेवण्यसाठी इन्सुलिनची निर्मिती करू शकत नाही.

टाईप २ चे टाईप १ मध्ये रुपांतर होऊ शकतं का?

डायबिटीस  टाईप २ चे टाईप १ मध्ये रुपांतर होऊ शकतं असं वाटणं सहाजिक आहे. अशी स्थिती उद्भवणं अनेकदा शक्य नसतं. जरी लक्षणं समान असली तरी हे आजार एकमेकांपासून वेगळे आहेत. टाईप १ डायबिटीसचा ऑटोइम्यून आजारांमध्ये समावेश होतो. ज्यामुळे शरीरातील निरोगी पेशींवर परिणाम होऊन संख्या कमी होते. अनुवांशिकतेनं किंवा इतर कारणांमुळे उद्भवतो. CoronaVirus News: सावधान! अँटीबॉडी संपल्यानंतर कोरोनाचा पुन्हा धोका; ICMR ने दिला गंभीर इशारा

या आजारानेग्रस्त असलेल्या लोकांना इन्जेक्शन्स घ्यावीच लागतात. त्याशिवाय कोणता पर्याय नसतो. याऊलट डायबिटीस टाईप 2 चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवतो.  सकारात्मक जीवनशैली, चांगली राहणीमान, व्यायाम, संतुलित आहार, वेळोवेळी वैद्यकिय तपासणी करणं यांमुळे तुम्ही हा आजार नियंत्रणात ठेवू शकता. डायबिटीस टाईप २ चे टाईप १ मध्ये रुपांतर होणे शक्य नसते. CoronaVirus News: 'हे' एक छोटंसं काम कराल, तर कमी होईल कोरोनाचा धोका; संशोधनातून दावा

Web Title: Coronavirus: Doctors are now probing whether covid-19 is causing diabetes even with no history of the disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.