प्रत्येक प्रिस्क्रिप्शनमध्ये या मेडिसिनचं नाव; कोरोना काळात विकल्या गेल्या तब्बल 350 कोटी गोळ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 08:20 PM2022-01-22T20:20:35+5:302022-01-22T20:21:31+5:30
23.6 कोटी रुपयांच्या विक्रीसह सहाव्या स्थानावर राहिली क्रोसिन (Crocin)...
कोरोना महामारीच्या काळात अनेक ओषधांच्या विक्रीचे विक्रम झाले. Dolo 650 हे औषध तर या काळात सर्वाधिक वेळा Prescribe झालेले औषध ठरले. या काळात Dolo 650 च्या तब्बल 350 कोटी गोळ्या विकल्या गेल्या. साधारणपणे 567 कोटी रुपयांच्या विक्रीचा हा आकडा, या काळात या औषधाची किती डिमांड होती, हे दर्शवतो.
दुसऱ्या लाटेदरम्यान सर्वाधिक विक्री -
Dolo 650 ची सर्वाधिक विक्री दुसऱ्या तिमाहीत झाली. एप्रिल 2021 मध्ये Dolo 650 च्या तब्बल 49 कोटी रुपयांच्या गोळ्या (टॅबलेट) विकल्या गेल्या. हेल्थकेयर रिसर्च फर्म IQVIA नुसार, या मेडिसिनचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक सेल आहे. यही वजह है कि लोगों ने इसे भारत का नेशनल टैबलेट और फेवरिट स्नैक कहना शुरू कर दिया था.
2019 मध्ये विकले गेले एवढे पॅरासिटामॉल -
Dolo 650 मध्ये पॅरासिटामॉल (Paracetamol) अॅक्टिव्ह इंग्रेडिएंट्स असते. 2019 मध्ये सर्वच ब्रँड्सच्या पॅरासिटामॉलची जवळपास 530 कोटींची रुपयांची विक्री झाली होती. 2021 मध्ये हा आकडा 924 कोटी रुपयांवर पोहोचला. Dolo ही 2021मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या अँटी-फिव्हर आणि अॅनालजेसिक टॅबलेट्समध्ये दुसऱ्या स्थानावर होती. 2021 मध्ये या मेडिसिनचा एकूण टर्नओव्हर 307 कोटी रुपये एवढा होता. क्रोसिन (Crocin) 23.6 कोटी रुपयांच्या विक्रीसह सहाव्या स्थानावर राहिली.