कोरोना रुग्णांचे फक्त १० दिवसात उपचार होणार; 'या'औषधांच्या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 09:39 AM2020-06-07T09:39:07+5:302020-06-07T09:45:12+5:30

कंपनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधाची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

Coronavirus drug update clinical trial starts for covid 19 treatment only in 10 days patients | कोरोना रुग्णांचे फक्त १० दिवसात उपचार होणार; 'या'औषधांच्या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी

कोरोना रुग्णांचे फक्त १० दिवसात उपचार होणार; 'या'औषधांच्या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी

Next

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणात लसीच्या शोधात सगळ्याच देशातील शास्त्रज्ञ आहेत.  तसचं औषध तयार करण्यासाठी देशातील कंपन्यांचा रिसर्च सुरू आहे. औषध तयार करणारी कंपनी सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज यापैकीच एक आहे. ही कंपनी झाडांवरील औषधांची एक्यूसीएच आधारित निर्मीती करते. या औषधांमध्ये कोरोनाच्या उपचारांची संभावना दिसून येत आहे. कंपनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हे औषधाची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. 

सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार  कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी झाडांपासून तयार झालेल्या औषधांवर एक्यूसीएचे परिणाम दिसून आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यात आलं आहे. या औषधाच्या निर्मितीसाठी FDA कडून परवागनी देण्यात आली आहे.  झाडांमध्ये असलेल्या औषधी गुणांवर आधारीत हे औषधं तयार करण्यात येणार आहेत. या औषधांचे सध्या ट्रायल सुरू आहे. 

या औषधाचे १२ केंद्रांवर २१० रुग्णांवर  परिक्षण केले जाणार आहे. यात रुग्णांना १० दिवसांसाठी निरीक्षणासाठी ठेवण्यात येणार आहे. या लसीचे क्लिनिकल रिजल्ट ऑक्टोबरपर्यंत येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.  एक्यूसीएच चा विकास डेंग्यूच्या आजारासाठी केला जातो. यामध्ये विषाणूंना निष्क्रिय करण्याची क्षमता असते. म्हणून कोरोनासाठी सुद्धा या औषधाचा वापर केला जाणार आहे. 

एक्यूसीएच मानवी शरीरासाठी कितपत सुरक्षित आहे. याबाबतचे संशोधन पूर्ण झाले असून आता हे औषध दुसऱ्या टप्प्यात आहे. जर क्लिनिकल ट्रायलमध्ये हे औषध विषाणूंना नष्ट करण्यासाठी प्रभावी ठरले तर कोरोनाच्या लढाईविरुद्ध शस्त्र ठरू शकेल. काही दिवसांपूर्वी कोरोनाचे उपचार शोधण्यासाठी स्पेनमध्ये सुद्धा संशोधकांनी ६ हजारांपेक्षा जास्त औषधांवर परिक्षण केले होते. यात कोविड मूनशॉट रिसर्च प्रोग्रामच्या माध्यामातून रिसर्चकर्त्यांनी दोन औषधांवर परिक्षण केले होते. ज्यात कारप्रोफेन आणि सेलेकॉग्सिब यांचा समावेश होता. ही दोन्ही एंटी-इंफ्लेमेट्री ड्रग आहेत. 

ऑक्सफोर्डच्या कोरोना वॅक्सीनचं भारतात उत्पादन सुरू, लाखो डोज होतील तयार....

CoronaVirus News : टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध

Web Title: Coronavirus drug update clinical trial starts for covid 19 treatment only in 10 days patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.