कोरोनाचा असाही फायदा! पूर्णपणे नष्ट झाला आहे दरवर्षी लाखोंना त्रास देणारा हा आजार....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 09:14 AM2021-02-01T09:14:18+5:302021-02-01T09:17:59+5:30

फ्लूच्या केसेस गेल्या १३० वर्षात पहिल्यांदाच इतक्या कमी झाल्या आहेत. फ्लूच्या केसेसमध्ये ९५ टक्के घट आढळून आली आहे.

Coronavirus effect flu wiped out lowest level in 130 years | कोरोनाचा असाही फायदा! पूर्णपणे नष्ट झाला आहे दरवर्षी लाखोंना त्रास देणारा हा आजार....

कोरोनाचा असाही फायदा! पूर्णपणे नष्ट झाला आहे दरवर्षी लाखोंना त्रास देणारा हा आजार....

Next

कोरोना व्हायरस अजूनही पूर्णपणे नष्ट झालेला नसून अनेकांनी याची लागण होत आहे. कोरोनामुळे जगभरातील लोकांचं नुकसानच अधिक झालं आहे. पण काही चांगल्याही गोष्टी घडल्या आहेत. त्यातील एक म्हणजे ब्रिटनमध्ये फ्लू  जवळपास नष्ट होण्याच्या स्थितीत पोहोचला आहे, असा दावा एका रिसर्चमध्ये करण्यात आला. फ्लूच्या केसेस गेल्या १३० वर्षात पहिल्यांदाच इतक्या कमी झाल्या आहेत. फ्लूच्या केसेसमध्ये ९५ टक्के घट आढळून आली आहे.

ब्रिटीश वृत्तपत्र द संडे टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रॉयल कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्सचे चेअर प्रोफेसर मार्टिन मार्शल म्हणाले की, कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लोकांनी जे उपाय केले आहेत, त्यामुळे फ्लूच्या केसेस कमी झाल्या आहेत. (हे पण वाचा : कोरोनानंतर रुग्णांच्या वजनात कमालीची घट झाल्याने भीती, ३५० जणांनी जाणून घेतली कारणे)

ब्रिटनमध्ये जानेवारीमध्ये फ्लूची लक्षणे नोंदवणाऱ्या लोकांची संख्या फार कमी झाली आहे. प्रति एक लाख लोकांवर फ्लूची लक्षणे दिसण्याची सरासरी संख्या १.१ समोर आली आहे. तर गेल्या ५ वर्षातील सरासरी बघायची तर प्रति एक लाख लोकांमध्ये फ्लू ची लक्षणे रिपोर्ट करणाऱ्या लोकांची संख्या २७ होत होती.

सामान्यपणे ब्रिटनसहीत अनेक देशांमध्ये जानेवारी महिना फ्लूसाठी सर्वात घातक काळ मानला जात होता. पण यावर्षी फ्लूच्या केसेस कमी आढळून आल्या आहेत. एक्सपर्ट सांगतात की, असं चित्र तयार झालं आहे की, आता फ्लू नष्ट झाला आहे. (हे पण वाचा : कोरोना व्हायरसमुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम?; नवीन संशोधनातून खुलासा)

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिसर्च सेंटरचे डायरेक्टर आणि फ्लू एक्सपर्ट  जॉन मॅकुले म्हणाले की, इतिहासात फ्लूच्या इतक्या कमी केसेस तेव्हा नोंदवण्यात आल्या होत्या जेव्हा फ्लूच्या केसेसची मोजणी सुरू झाली होती. म्हणजे १८८८ मध्ये हे सुरू झालं होतं. १८८९-९० मध्ये फ्लू ची महामारी आली होती आणि त्यावेळी मोठ्या संख्येने  लोक आजारी पडले होते.
 

Web Title: Coronavirus effect flu wiped out lowest level in 130 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.