Coronavirus : कोरोना व्हायरसबाबत तज्ज्ञांकडून चिंता वाढवणारा खुलासा, असं झालं तर काय असेल चित्र?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 01:38 PM2020-06-16T13:38:16+5:302020-06-16T13:39:08+5:30
लॉकडाऊनमधून अनेक देशांमध्ये सूट दिल्याने अनेकांना असं वाटत आहे की, कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी झाला. पण असं अजिबात नाहीये. याबाबत एका तज्ज्ञांनी चिंता वाढवणारं मत व्यक्त केलंय.
बराच मोठा काळ लॉकडाऊन लागू केल्यानंतर आता जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट दिली जात आहे. कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी झाल्याने असं केलं जात असल्याचं तुम्हाला वाटत असेल तुम्ही चुकत आहात. कारण सूट दिली जात असली तरी तज्ज्ञांचं मत आहे की, कोरोना व्हायरस सध्या कुठेही जाणार नाहीये. कोरोनामुळे अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करावं लागू शकतं.
जगात सर्वाधिक पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने अमेरिका हैराण आहे. देशात लॉकडाऊनमध्ये सूट दिली जात आहे. पण अनेक राज्यातील नेत्यांनी इशारा दिला आहे की, पुन्हा लॉकडाऊन केलं जाऊ शकतं. तेच अमेरिकेतील मिन्नसोटा युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर इन्फेक्शन डिजीज रिसर्च अॅन्ड पॉलिसीचे डायरेक्टर मायकल टी ओस्टरहोम यांनी सांगितले की, व्हायरस इतक्यात कुठेच जाणार नाहीये.
तर दुसरीकडे स्वत: कोरोना व्हायरसने संक्रमित झालेले वायरॉलॉजिस्ट जोसेफ फेअर म्हणाले की, जेव्हा व्हायरस लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरेल तेव्हा आधीच्या स्थितीमध्ये येण्यासाठी वॅक्सीनशिवाय काहीही पर्याय उरणार नाही.
न्यूयॉर्क टाइम्समध्येही प्रकाशित रिपोर्टनुसार, संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ मायकल टी ओस्टरहोम म्हणाले की, 'व्हायरस जोपर्यंत 60 ते 70 टक्के लोकांना संक्रमित करत नाही तोपर्यंत थांबणार नाहीये. एक्सपर्ट्सनी याआधी सुद्घा हे सांगितलं की, वॅक्सीन मिळाली नाही तर जगातले 60 ते 70 टक्के लोक याने संक्रमित होऊ शकतात.
एक्सपर्ट्सनी सांगितले की, साधारण 70 टक्के लोक संक्रमित झाल्यावर कम्युनिटीमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते आणि पुढे व्हायरसची साखळी तुटू शकते. सध्या अमेरिकेत 20 लाखांपेक्षा अधिक लोकांना याची लागण झाली आहे. पण ही संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.
तज्ज्ञ मायकल टी ओस्टरहोम म्हणाले की, सध्याची आकडेवारी सांगते की अमेरिकेतील 8 राज्यांमध्ये इन्फेक्शन दर स्थिर आहे. तर 22 राज्यांमध्ये संक्रमण दर वाढत आहे आणि बाकी ठिकाणी घटत आहे. ते म्हणाले की, अनेक राज्यांमध्ये आताही हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहेय.
Coronavirus : कोरोनावरील वॅक्सीनबाबत आणखी एक मोठं यश, लवकरच मिळू शकते खूशखबर!
दिलासादायक! कोणत्याही साईड इफेक्टशिवाय चीनच्या 'या' लसीने कोरोनाला हरवता येणार; तज्ज्ञांचा दावा
Coronavirus : 'हा' आहे कोरोनापासून बचावासाठी हॅडवॉश आणि सोशल डिस्टंसिंगपेक्षाही बेस्ट उपाय!