Coronavirus : एसीमुळेही घरात कोरोना शिरतो का? वाचा काय सांगतो रिसर्च...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 10:05 AM2020-04-18T10:05:40+5:302020-04-18T10:06:09+5:30

एका दुसऱ्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, घरात राहूनही लोक कोरोनाचे शिकार होऊ शकतात.

Coronavirus : experts says Centralized AC can help droplet transmission api | Coronavirus : एसीमुळेही घरात कोरोना शिरतो का? वाचा काय सांगतो रिसर्च...

Coronavirus : एसीमुळेही घरात कोरोना शिरतो का? वाचा काय सांगतो रिसर्च...

Next

कोरोना व्हायरसचं थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. अशात एसीची हवा घातक ठरू शकते असा दावा काही रिसर्चमधून केला जातोय. एका रिसर्चनुसार, सेंट्रल एसी जो मॉल, हॉस्पिटल किंवा गर्दीच्या ठिकाणी लावलेला असतो, त्याने कोरोना व्हायरस पसरू शकतो.

असं ड्रॉपलेट ट्रान्समिशनच्या माध्यमातून होऊ शकतं. पण या रिसर्चमध्ये घरातील एसीला सेंट्रल एसीच्या तुलनेत सुरक्षित मानलं गेलंय. एका दुसऱ्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, घरात राहूनही लोक कोरोनाचे शिकार होऊ शकतात.

ड्रॉपलेट टॅान्समिशनने कोरोनाची लागण होण्याचा मुद्दा भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजचे प्राध्याक डॉक्टर लोकेंद्र दवे यांनी सांगितला. डॉ. दवे यांनी एका इंटरनॅशनल रिसर्चचा हवाला देऊन हे सांगितलं. यात समोर आलं की, 10 कोरोनाच्या रूग्णांनी एका रेस्टॉरन्टमध्ये जेवण केलं होतं. असे मानले गेले की, तिथे सेंट्रल एसी असल्याने ड्रॉपलेट ट्रान्समिशन झालं असेल. रिसर्चनुसार, अशा मोठ्या एसीचा एअरफ्लोमुळे कोरोनाला पसरण्यास मदत होऊ शकतो.

डॉ. दवे यांनी सांगितले की, असंच भोपळमध्येही झालेलं असू शकतं. इथे आरोग्य विभागातील 40 पेक्षा जास्त लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दवे यांचं मत आहे की, सेंट्रल एसीच्या तुलनेत घरातील एसी सेफ आहे. घरातील एसीने धोका कमी होऊ शकतो.

जर तुम्हाला वाटत असेल की, घरात राहून कोरोनापासून बचाव केला जाऊ शकतो तर तुम्ही चुकीचा विचार करताय. सेंटर फॉरर सायन्स अ‍ॅन्ड एन्वायर्नमेंटनुसार, चुकीच्या डिझाइनचे एअर कंडिशन सिस्टीम, घरात व्हेंटिलेशन ठिक नसणे कोरोनासा वाढण्यासाठी मदत करू शकतं. यासाठी घरांची चुकीची बनावट कारणीभूत आहे. 

या रिसर्चनुसार, बाहेरील गरम तापमान जर कोरोनाला कमजोर करेल तर घरात एसीने थंड केलं गेलेलं तापमान या व्हायरसला वाढण्यास मदत करू शकतं.

Web Title: Coronavirus : experts says Centralized AC can help droplet transmission api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.