कोरोनाकाळात वावरताना 'या' सवयी बदलायला हव्या, अन्यथा संक्रमणाचा असू शकतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 12:21 PM2020-06-16T12:21:59+5:302020-06-16T12:24:28+5:30

नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडणं आणि सध्याच्या कोरोनाकाळात घराबाहेर पडणं यात खूप फरक आहे.

CoronaVirus : Habits that cause weaken immunity system | कोरोनाकाळात वावरताना 'या' सवयी बदलायला हव्या, अन्यथा संक्रमणाचा असू शकतो धोका

कोरोनाकाळात वावरताना 'या' सवयी बदलायला हव्या, अन्यथा संक्रमणाचा असू शकतो धोका

googlenewsNext

कोरोनाच्या माहामारीत सध्या लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांचे घराबाहेर पडण्याचं प्रमाण वाढत आहे. नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडणं आणि सध्याच्या कोरोनाकाळात घराबाहेर पडणं यात खूप फरक आहे. कारण कधीही तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

विषाणूंच्या संक्रमणापासून लांब राहण्यासाठी किंवा सामना करण्यासाठी रोगप्रतिराकशक्ती चांगली असणं गरजेंच आहे.  रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर तुम्ही कोणत्याही आजारांतून बाहेर येऊ शकता. पण काही सवयींमुळे तुमची रोगप्रतिकरकशक्ती कमी होऊ शकते. 

फास्टफुड खाणं टाळा

चुकीच्या आहाराचा आपल्या रोगप्रतिकारकशक्तीवर दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे जंक फूड, इन्स्टंट फूड खाणं टाळा. अन्यथा रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होऊन आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून संतुलित आहार घेऊन पूर्ण  झोप घ्या. कारण झोप पूर्ण न झाल्यास वेगवेगळ्या समस्या उद्भवण्याचा धोका असतो.

मादक पदार्थाचे सेवन

मद्यपान आणि धूम्रपानामुळे यकृत, फुफ्फुसावर परिणाम तर होतोच शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही कमजोर होते. तसंच पचनाशी निगडीत समस्या उद्भवण्याचा धोका असतो. याशिवाय कॅन्सरचा धोका सुद्धा असू शकतो.

ताण-तणाव घेणं

छोट्या छोट्या गोष्टींवरही तुम्हाला ताण घेण्याची सवय असेल, तर ते सोडून द्या. एका अभ्यासानुसार जास्त ताण घेणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्दी-तापासारखी समस्या जास्त उद्भवते. कारण कोर्टिसॉल हार्मोन आपल्या पांढऱ्या रक्तपेशी नष्ट करतो आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.

आळशीपणा

शारीरिकरित्या सक्रिय नसाल, तर त्याचा तुमच्या रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे शारीरिक कार्य, व्यायाम करा. त्यासाठी रोज चालायला किंवा धावायला जायला हवं. यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढून शरीर ताजेतवाने राहिल.

CoronaVirus : WHO चा धोक्याचा इशारा; पुढच्या २ आठवड्यात रोज १ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढणार

Coronavirus : कोरोनावरील वॅक्सीनबाबत आणखी एक मोठं यश, लवकरच मिळू शकते खूशखबर!

Web Title: CoronaVirus : Habits that cause weaken immunity system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.