पावसाळ्यात घश्यातील खवखवीमुळे कोरोनाचा धसका घेण्याआधी; 'या' उपायांनी तब्येत सांभाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 06:17 PM2020-06-11T18:17:39+5:302020-06-11T18:24:17+5:30
कुटुंबातील एखादी व्यक्ती जरी आजारी पडली असेल तर भीतीचं वातावरण तयार होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जगभरासह भारतात सुद्धा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. आता पावासाला सुरूवात झाली आहे. दरवर्षी पावसाळ्याची सुरूवात झाली की वातावरणातील बदलांमुळे लोकांना सर्दी, खोकला, ताप, अंग दुखीच्या समस्या उद्भवतात. पण यावर्षी कोरोनाच्या माहामारीचं संक्रमण सर्वत्र पसरल्यामुळे लोकांना आजारी पडण्याची धास्ती वाटते. कुटुंबातील एखादी व्यक्ती जरी आजारी पडली असेल तर भीतीचं वातावरण तयार होत आहे.
नेहमी घाबरण्यासारखीच स्थिती असते. असं नाही. तुम्ही घरच्याघरी रोज आहारातून पोषक घटकांचे सेवन करून स्वतःची रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकता आणि आजारांना स्वतःपासून लांब ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला कोरोना व्हायरसपासून बचावासाठी तसंच घसा खवखवण्याच्या समस्येचा दूर ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा याबाबत सांगणार आहोत.
हळदीचं दुध
हळद ही औषधी मानली जाते. हळदीत अँटिमायक्रोबिअल घटकही असतात. त्यामुळे फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि जखम भरण्यासाठीच नव्हे तर घशाच्या खवखवीवरही हळद उपयुक्त आहे. त्यामुळे कोमट दुधात हळद मिक्स करून सेवन करा.
कोमट पाणी
अनेक आजार हे शरीरात पाण्याची कमतरता असल्यास म्हणजे डिहायड्रेशनमुळे उद्भवतात. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. मात्र घशाची खवखव दूर करण्यासाठी कोमट पाणी प्या. डिहायड्रशेन झाल्यास वेळेवर वेळेवर औषधं न घेतल्यास हीट स्ट्रोकचा धोका असतो, काही लक्षणांकडे लक्ष देणं गरजेच आहे. डोळ्यांसमोर अंधार येणं, सतत चक्कर येणं ही डी हायड्रेशनची लक्षणं आहेत.
लवंग
लवंगाच्या पाण्याने तुम्ही गुळण्याही करू शकता. लवंगामध्ये असा घटक असतो जो नैसर्गिक पेनकिलर आणि अँटिमायक्रोबिअल म्हणून काम करतो. लवंगाची पूड करून पाण्यात टाकून उकळू घ्या. लवंग घातलेलं असं कोमट पाणी प्या.
मध
घसा खवखवत असेल तर एक चमचा मध तुम्ही असंच पिऊ शकता. कोमट पाण्यात मध आणि लिंबूरस टाकूनही पिऊ शकता.
आलं
आल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. आलं हे खवखवणाऱ्या घशासाठी उत्तम असा नैसर्गिक घटक आहे. आलं किसून दोन कप पाण्यात टाकून हे पाणी उकळून घ्या. पाणी गाळून प्या. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मध आणि लिंबूरस टाकू शकता.
शिंकण्याचं हे नवं तंत्र शिकावंच लागेल भाऊ... कारण आपल्याला रोगाशी लढायचंय!
तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाही कोरोना विषाणू; जर लक्षात ठेवाल 'या' ५ गोष्टी