काळजी वाढली! 'ही' समस्या असलेल्यांना दुसऱ्यांदा होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 04:45 PM2020-07-05T16:45:12+5:302020-07-05T16:53:04+5:30
CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत ICMR ने लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.
कोरोनाच्या माहामारीने जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाबाबत संधोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी लवकरात लवकर लस किंवा औषध शोधलं जावं यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. भारतात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी असला तरी कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत ICMR ने लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.
कोरोना व्हायरसचा सगळयात जास्त धोका रक्तदाब, डायबिटीस आणि हृदयाचे आजार असलेल्या लोकांना आहे. या संशोधनातून दिसून आले की, हृदयरोग, उच्च रक्तदाब यांसारखे आजार असलेल्या लोकांना कोरोना कोरोना व्हायरसचे संक्रमण दुसऱ्यांदा होण्याचा धोका जास्त असतो.चीनच्या होंजहोग युनिव्हर्सिटीतील विज्ञान आणि प्रौद्योगिकी विभागातील तज्ज्ञांनी हे संशोधन केले आहे.
या संशोधनासाठी वुहानच्या रुग्णालयात भरती असलेल्या ९३८ रुग्णांची माहिती गोळा करण्यात आली होती. रिपोर्टनुसार कोरोना संसर्गामुळे फुफ्फुसांमध्ये झालेले संक्रमण लवकर बरं होत नाही. चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर लोक निरोग आहेत असं समजलं जातं. पण काही दिवसांनी पुन्हा कोरोनाचं संक्रमण होतं. हार्ट अटॅक, हाय बीपीच्या रुग्णांमध्ये हा धोका जास्त असतो.
कोरोना व्हायरसमुळे नाक, घसा आणि श्वसन तंत्रावर परिणाम होतो. जे लोक रक्तदाब, हृदयाच्या विकारांनी पिडीत आहेत. त्या लोकांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका जास्त असतो. कारण आधीच अशा शारीरिक समस्या असतील तर व्हायरसच्या संक्रमणातून बाहेर येणं कठीण असतं. परत एकदा कोरोनाने हल्ला केल्यास शरीर कोरोनाशी लढू शकेल की नाही. याबाबत शंका असते.
आईसीएमआरने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार दीर्घकाळ एखाद्या आजारानेग्रस्त असलेल्या लोकांनी शारीरिक स्थितीकडे लक्ष द्यायला हवे. एखाद्या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीला कोरोनाचं संक्रमण होईलचं असे नाही. पण त्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे नियमित न चुकता सेवन करायला हवे. जेणेकरून व्हायरसच्या प्रसाराचा धोका टाळता येईल.
दरम्यान भारतात गेल्या २४ तासांत ६१३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एका दिवसात कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण दगावलेले नाहीत. देशात सध्याच्या घडीला २ लाख ४४ हजार ८१४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १९ हजार २६८ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाचा धोका वाढत असल्याचं अधोरेखित झालं आहे.
धक्कादायक! चीनमध्ये 'असा' झाला कोरोनाचा प्रसार; WHO च्या पडताळणीआधीच खुलासा
जगभरातील 'या' १० मोठ्या कंपन्यामध्ये तयार होतेय कोरोनाची लस, जाणून घ्या कधीपर्यंत येणार