CoronaVirus : आता हसणाऱ्यांपासून रहा सावधान, कोरोना पसरण्याचं ठरू शकतं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 01:09 PM2020-03-27T13:09:09+5:302020-03-27T13:16:23+5:30
जोर-जोर हसत असलेल्या लोकांकडून कोरोनाच्या संक्रमाणाचा धोका सगळ्याच आधी पोहोचतो.
सध्या संपूर्ण जगभरसह भारतात सुद्धा कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. ज्यामुळे संपूर्ण देशभरातील रस्त्यांवर शांतता आणि शुकशुकाट दिसून येत आहे.
जे जोर जोरात हसत असलेल्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा कोरोनाचं इन्फेक्शन पसरू शकतं. अशी तपासणी डॉक्टर करत आहेत. Indian Council of Medical Research आणि All India Institute Of Medical Sciences नवी दिल्ली येथिल डॉक्टरांनी खास रिसर्च केला आहे. ज्यात असं दिसून आलं की जोर-जोर हसत असलेल्या लोकांकडून कोरोनाच्या संक्रमाणाचा धोका सगळ्यात आधी पोहोचतो.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा एखादी व्यक्ती जोर-जोरात हसते तेव्हा त्या व्यक्तीच्या तोंडातून काही पाण्याचे ड्रॉपलेट्स निघत असतात. जे शिंकण्यातून आणि खोकण्यातून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्सप्रमाणे असतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही जोरजोरात हसत असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असाल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण जर ती व्यक्ती कोरोना व्हायरसने इन्फेक्टेड असेल तर तिच्या हसण्यातून बाहेर पडत असलेले ड्रॉपलेट्स तुमच्या शरीरात गेल्यामुळे तुम्हालाही कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन होऊ शकतं. ( हे पण वाचा- रोज गरम पाण्याने आंघोळ केल्यास कमी होईल हृदयरोगांचा धोका, रिसर्चमधून खुलासा...)
त्यासाठी सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं गरजेचं आहे. अशा लोकांपासून १ मीटर अंतरावर राहणं फायद्याचं ठरणार आहे. त्याासाठी सरकारने सांगितलेल्या लॉकडाऊनचं पालन करून सहकार्य करणं गरजेचं आहे. खोकताना किंवा शिंकताना आपल्यामुळे इतर व्यक्तींना त्रास होणार नाही हे पाहणं गरजेचं आहे. ( हे पण वाचा-Coronavirus: सतत स्वच्छतेच्या सवयीने व्हाल ओसीडीचे शिकार, जाणून घ्या स्वच्छतेची लिमिट!)